वडिलांच्या मृतदेहाऐवजी दुसराच दिला, स्मशानभूमीत उघडून पाहिल्यावर समजले, संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :-
वडिलांच्या मृतदेहाऐवजी दुसऱ्याचाच मृतदेह दिल्याचे स्मशानात गेल्यावर समजले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी यवतमाळ येथील रुग्णालयात तोडफोड केली. आज सकाळी हा प्रकार घडला. धक्कादायक म्हणजे बिल भरले नसल्याने हा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला नव्हता.
ॲड.अरुण गजभिये यांचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री मृत्यू झाला. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. नातेवाईक मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी पांढरकवडा रोडवरील मोक्षधामात पोहोचले. तेथे मृतदेह उघडून बघितला असता तो ॲड.गजभिये यांचा नसून दुसऱ्याचाच असल्याचे लक्षात आले.
त्यामुळे संतापलेले नातेवाईक मोक्षधामातून थेट शहा हाॅस्पिटलमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी डाॅक्टर व उपस्थित कर्मचाऱ्यांना जाब विचारला. संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली.

गजभिये यांच्याऐवजी सेवानिवृत्त सहायक फाैजदार दिगांबर शेळके यांचा मृतदेह दिल्याचे दिसून आले. शेळके यांचाही शनिवारी रात्रीच मृत्यू झाला होता. मात्र बिलाची रक्कम जमा न केल्याने त्यांचा मृतदेह रुग्णालयाने दिला नाही, असा आरोप मनीषा दिगांबर शेळके यांनी केला. ते मृतदेहासाठी रात्रीपासून रुग्णालयात ताटकळत होते. त्यांना रुग्णालय प्रशासनाने अद्याप प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे, असे सांगून ताटकळत ठेवले होते.


शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..