बंगाल हिंसाचाराच्या घटनेचा भाजपकडून निषेध ; महागाव तालुक्यात निदर्शने ; काळया फिती बांधून केला निषेध
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
निवडणूक प्रक्रिया संपताच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळून आला. गेल्या काही दिवसांत राज्यात विविध ११ भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा आरोप करत भाजपने तृणमूलला लक्ष्य केले असून बंगाल हिंसाचाराच्या घटनेचा महागाव तालुका भारतीय जनता पार्टी कडून काळया फिती बांधून निषेध केला आहे.
सत्तेवर येताच तृणमूल काँग्रेस हिंसाचार घडवून निष्पाप भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे.शेकडो दुकाने,घरात जाळपोळ करून भाजप कार्यालयात तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी तोडफोड केली असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे महागाव तालुकाध्यक्ष दीपक आडे यांनी केला आहे.
या सर्व जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या हिंसाचाराच्या घटनेचा कोविड १९ चे नियम पाळुन निषेध नोंदवला आहे. “लोकशाहीची हत्या करणारे ममता बॅनर्जी चा धिक्कार असो”, “तृणमूल काँग्रेसकी दादागिरी नही चलेगी”, “अमानवी कृत्याचा निषेध असो”, ” गुंडाराज नही चलेगा- जल्लोष नही उन्माद है” या सारख्या घोषणा देऊन व काळी फिती लाऊन निषेध करण्यात आला. यावेळी तालुक्यातील विविध भागात भाजपा तालुकाध्यक्ष दीपक आडे यांच्या नेतृत्वात निषेध नोंदविण्यात आला आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….