ब्रेक दि चेन अंतर्गत 15 मे पर्यंत निर्बंध कायम….
ब्रेक दि चेन अंतर्गत 15 मे पर्यंत निर्बंध कायम….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 30 :- ब्रेक दि चेन अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. तसेच सदर कालावधीत राज्यात कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. मुख्य सचिव यांच्या आदेशान्वये 1 मे च्या सकाळी 7 वाजेपासून ते 15 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध कायम करण्यात आले आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 यातील मार्गदर्शक सूचनेनुसार यवतमाळ जिल्ह्याकरीता 15 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध कायम केले आहे. तसेच सदर कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाचे 14 एप्रिल, 20 एप्रिल व 22 एप्रिल 2021 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना दिनांक 15 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील.
सदर आदेश यवतमाळ शहर व जिल्ह्याकरीता शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील. जे वरील आदेशांचे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.
०००००००

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….