वाघाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल ; शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा….

वाघाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल ; शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 26 :- पांढरकवडा वनविभागांतर्गत मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वन कक्षमध्ये वाघ मृत झाल्याची रविवारी सकाळी अंदाजे 10.30 वाजता माहिती मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगाने विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक (वन्यजीव), पांढरकवडा, मुकुटबन वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.जी. वारे, प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांचे प्रतिनिधी तसेच मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विरानी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, दिल्ली यांचे प्रतिनिधी यांनी घटनास्थळी भेट दिली व वस्तुस्थितीचे पाहणी केली.
सदर जागेची तपासणी केली असता वाघ नाल्याला लागून असलेल्या गृहेत मृत अवस्थेत दिसून आला. गळ्यात तारेचा फास अडकल्याचे, अणुकूचीदार हत्याराने मारल्याचे आणि गुहेच्या तोंडाशी आग लावल्याचे जाळलेल्या लाकडांवरून निदर्शनास आले. सदर वाघ मादी असून अंदाजे 4 वर्ष वयाची असण्याची शक्यता आहे. वाघिणीच्या पुढच्या पायाचे पंजे तोडल्याचेही आढळून आले आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंड, डॉ. अरुण जाधव, डॉ. एस. एस. चव्हाण, डॉ. डी. जी. जाधव व डॉ. व्ही.सी. जागडे यांचेमार्फत मोक्यावर शवविच्छेदन करण्यात आले असून शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्युचे नेमके कारण कळेल. सदर प्रकरणी प्राथमिक वनगुन्हा जारी करून गुन्ह्याचा तपास सहायक वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा), पांढरकवडा हे करीत आहेत.
०००००००

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….