कोविड लसीकरना साठी शहरात प्रशासनाने जनजागृती मोहीम राबवावी :- गोपु महामुने….


कोविड लसीकरना साठी शहरात प्रशासनाने जनजागृती मोहीम राबवावी :- गोपु महामुने….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकीरण देशमुख) :-
कोविड 19चा सामना सर्वजण मागील वर्षांपासून करीत आहोत त्या अनुषंगाने या संसर्ग जन्य आजाराबाबत अंनेक गोष्टीचे भान ठेवून वावरणे खूप गरजेचे झाले असून प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य झाले आहे. स्वतः सोबतच इतरांचाही कोरोना पासून आपण बचाव करू शकतो. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कोरोना संसर्गा पासून बचाव करण्यासाठी मागील दीड महिन्या पासून लस उपलब्ध झाली आहे या लसी बाबत बऱ्याच जणांचे सुरवातीला अनेक मत मतांतरे होते परंतु या रोगापासून बचाव करणारी ही लस प्रत्येक व्यक्ती साठी खूप गरजेची आहे. हे तज्ञानी वेळोवेळी सांगूनही अनेक जणांचा या लसीबाबत शंका कुशंका असू शकतात परंतु या सर्व शंकाच निरसन झाले आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांचा लस घेण्याकडे कल वाढणे गरजेचे आहे एकही नागरिक या लसी पासून वंचित राहू नये या करिता माहूर शहर व तालुक्यात कोविड लसीकरण मोहिमेसाठी प्रशासनाणे जन जागृती मोहीम राबवावी कारण माहूर शहरात लसीकरनासाठी अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. एक मे पासून अठरा वर्ष वया वरील नागरिकांना लस देण्याचे केंद्र सरकारने परवानगी दिली आहे त्यामुळे सर्व नागरिकांचे लसीकरण होईल अशी मागणी भाजप माहूर शहर अध्यक्ष तथा नगरसेवक गोपु महामुने यांनी केली आहे

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….