भरधाव ट्रक ची ट्रॅव्हल्सला धडक देवून उड्डाण पुलावर आदळला ; सुदैवाने जिवीतहानी नाही…

भरधाव ट्रक ची ट्रॅव्हल्सला धडक देवून उड्डाण पुलावर आदळला ; सुदैवाने जिवीतहानी नाही…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :-
भरधाव वेगाने नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची विरूध्द दिशेने येणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हल्स ला जोरदार धडक दिल्याने ट्रॅव्हल्स उड्डाणपुलावर आदळली.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना महागाव तालुक्यातील कलगाव टी पॉइंट जवळ आज (१९) मध्यरात्री साडेतीन च्या सुमारास घडली आहे.
प्राप्त माहिती नुसार,
ट्रक क्र.ओडी १५ एल ३६७२ ओडिशा वरून नांदेड ला स्टील रॉड घेवून जात होता. तर विरूध्द दिशेने येणारी ट्रॅव्हल्स (क्र.एम एच ४० बी एल ७१६१) तुळजापूर वरून नागपूर कडे प्रवासी घेवून जात होती.त्यावेळी ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकची ट्रॅव्हल्स ला जोरदार धडक बसली.धडक एवढी भीषण होती की ट्रॅव्हल्स जवळ असलेल्या उड्डाण पुलावर आदळली.त्यात
ट्रॅव्हल्स चालक शेख मोहम्मद शेख निजाम , व क्लिनर हे किरकोळ जखमी झाले आहे.तर ट्रक चालक मुन्ना शर्मा याच्या पायाला गभिर दुखापत झाली आहे.ग्रामस्थांनी अपघतग्रस्तांना सवना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून वृत्त लिहेपर्यंत जखमीची नावे कळू शकली नाहीत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….