रविवार पासून महागाव शहरात “जनता कर्फ्यु” ; तालुका व्यापारी महासंघाचा निर्णय….

रविवार पासून महागाव शहरात “जनता कर्फ्यु” ; तालुका व्यापारी महासंघाचा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :-
तालुक्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.त्यामुळे रविवार पासून महागाव शहरात रविवार दुपारी ३ वाजल्यापासून आठवडाभरासाठी कडक जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे.तर भाजी ,दूध आणि फळ विक्रेते यांना वेळेचे बंधन टाकण्यात आले असून सकाळी 9 ते 12 वाजे पर्यंत हातगाडी वर विक्री करता येणार आहे. शहरात बसस्थानक चौक , कलगाव टी पॉइंट आणि पेट्रोल पंपा नजीक रॅपीड अॅन्टीजन टेस्ट मोहीम राबविण्यात येणार आहे.
अनावश्यक दुकाने उघडी आढळल्यास दुकान 1 महिना सिल करण्यात येणार आहे.हा जनता कर्फ्यु रविवार दुपारी ३ वाजल्यापासून मंगळवार सकाळी ८ वाजेपर्यंत लागू करण्यात आला आहे.
या बैठकीला उपविभागीय महसूल अधिकारी स्वप्नील कापडणीस ,तहसीलदार नामदेव इसळकर, पोलीस निरीक्षक विलास चव्हाण, नायब तहसीलदार डॉ संतोष अडमुलवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ जब्बार पठाण, संभाजीदादा नरवाडे, रामराव पाटील ,तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे ,शहर अध्यक्ष स्वप्नील अडकिने ,सुरेश शर्मा, वसिम पारेख, रंगराव वानखेडे, राजू वाकोडे ,विजय जाधव ,राजू राठोड उपस्थित होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….