यवतमाळ शहरातील प्रतिबंधीत क्षेत्राच्या सीमा बंद…
यवतमाळ शहरातील प्रतिबंधीत क्षेत्राच्या सीमा बंद…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 16 :- यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे ज्या भागात रुग्ण आढळत आहे, तो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे निर्देश आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याकरीता उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडंट कमांडर यांना प्राधिकृत केले आहे.
त्याअनुषंगाने यवतमाळ तहसिलदार यांनी प्रस्तावित केल्यानुसार यवतमाळ शहरातील मौजा कोळंबी, नालमवार लेआऊट प्रभाग क्र.28 वडगाव, शिवाजी नगर प्रभाग क्र.14 लोहारा येथे दोन ठिकाणी, आदर्श नगर संदीप मंगलम मागे प्रभाग क्र.5, रत्नदीप नगर प्रभाग क्र.26, लोहारा, तसेच यवतमाळ तालुक्यातील मौजा दहेली, मौजा मुरझडी (चिंच), मौजा तळेगाव, मौजा भारी, वाई (रुई) या प्रस्तावित भागास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून सदर भागाच्या सीमा पुढील आदेशापावेतो बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
वरील नमुद क्षेत्रात एकत्रित प्रतिबंधित क्षेत्र आराखडयानुसार संबंधीत पोलिस स्टेशन अधिकारी, न.प मुख्याधिकारी व संबंधित ग्रामपंचायत सचिव यांनी कार्यवाही करावी. आदेशाच्या कालावधीत शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेस्तव कर्तव्य करण्याची मुभा राहील. तसेच मुख्याधिकारी, यवतमाळ ग्रामपंचायत सचिवांनी अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना परवाना, पासेस निर्गमित कराव्यात.
परवाना, पासेस धारकांची यादी संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी यांना तात्काळ द्यावी. तसेच पोलिसांनी नेमून दिलेल्या ठराविक वेळेत परवाना, पासेसधारकांना सेवा पुरविण्याची मुभा राहील. अत्यावश्यक सेवा पुरवठा करतांना सामाजिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) चे व इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी न.प.मुख्याधिकारी व ग्रामपंचायत सचिवांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचा-यांमार्फत करावी.
वरील आदेशांचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियम अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे यवतमाळचे उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी आदेशात नमुद केले आहे.
०००००००

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..