माहुरात ९० बॉटल रक्तदान करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन….! डॉ.बाबासाहेब आंबेडकरी युथ फोरमचा समाजोपयोगी उपक्रम…!

माहुरात ९० बॉटल रक्तदान करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन….!
डॉ.बाबासाहेब आंबेडकरी युथ फोरमचा समाजोपयोगी उपक्रम…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून कोरोना विषाणूच्या प्रकोपास आळा घालून साध्या पद्धतीने साजरी करण्याच्या प्रशासनाच्या सुचनाचे पालन करून माहूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर युथ फोरमच्या वतीने १३० व्या जयंती निमित्य १३० बॉटल रक्तदान करण्याचा संकल्प करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. होते. सकाळी १० वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. बुद्ध विहार समिती माहूरचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षा कु,शीतल जाधव, माजी नगरध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे, माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार, नगरसेविका सौ,ज्योती कदम, नगरसेवक गोपू महामुने, पुंडलिकराव भगत, मनोज कीर्तने, भाग्यवान भवरे, नगरसेवक दीपक कांबळे,शिवसेना शहरप्रमुख निर्धारी जाधव तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदचे जिल्हाध्यक्ष जयकुमार अड्कीने,अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी गुरु रविदास समता परिषदेचे तालुकाध्यक्ष अॅड. नितेश बनसोडे ,गोर सेना तालुकाध्यक्ष प्रफुल जाधव, ज्ञानेश्वर पवार , सिद्धार्थ तामगाडगे,एस.एस. पाटील, संजय सुरोशे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या रक्तदान शिबिरात ९० रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या रक्तदान शिबिराला माहूरचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी सदिच्छा भेट दिली. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील रक्तपेढीच्या चमू मध्ये डॉ.नितेश इंगोले, शरद औचार,बाबाराव गायकवाड, अतुल ताकसांडे, शेख अब्दुल सय्यद आली यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रास्ताविक व आभार प्रदर्शन आयोजक राहुल भगत यांनी केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी नवीन वाघमारे, अरविंद कांबळे, एकनाथ मानकर, अमोल शेंद्रे, शंतनू कांबळे, आदित्य खंदारे, कॉ. प्रफुल कौडकर, प्रसाद चौधरी, आगाखान पठाण, हर्षवर्धन भरणे, शुद्धोधन हरणे, प्रतिक कांबळे अभिषेक खंदारे सह समता सैनिक दल, एसएफआय, गोरसेना, मराठी पत्रकार संघ, बिरसा ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी, लहूजी शक्ती सेना, अ.भा.माळी संघ, समता परिषद, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, पुरोगामी शिक्षक संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शहीद टिपू सुलतान ब्रिगेड, च्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..