रेमडेसीवीरच्या वाटपावर प्रशासनाचे नियंत्रण ; खाजगी कोव्हीड रुग्णालयातील डॉक्टरांसोबत जिल्हाधिका-यांचा संवाद…
रेमडेसीवीरच्या वाटपावर प्रशासनाचे नियंत्रण ; खाजगी कोव्हीड रुग्णालयातील डॉक्टरांसोबत जिल्हाधिका-यांचा संवाद…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 11 :- कोरोनाबाधित रुग्णांना आवश्कतेनुसार देण्यात येणारे रेमडेसीवीर इंजेक्शन जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून वाटपावर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण आहे, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केले.
खाजगी कोव्हीड रुग्णालयात रेमडेसीवीरच्या तक्रारी संदर्भात जिल्हाधिका-यांनी खाजगी कोव्हीड रुग्णालयाच्या डॉक्टरांशी व्हीसीद्वारे संवाद साधला. रेमडेसीवर इंजेक्शनची खाजगीरित्या कुठेही विक्री होणार नाही. ड्रग्ज निरीक्षकांच्या सनियंत्रणात खाजगी कोव्हीड रुग्णालयाला विक्री करण्यात येईल. तसेच यावर प्रशासनाचेसुध्दा प्रत्यक्ष नियंत्रण राहील. तसेच खाजगी कोव्हीड रुग्णालयातील बेडक्षमता, भरती असलेल्या रुग्णांची संख्या यानुसार रेमडेसीवीर इंजेक्शन पुरविण्यात येतील. कोव्हीड प्रोटोकॉलच्या नियमांचे तंतोतंत पालन करून या इंजेक्शनचा वापर करावा. तसेच डॉक्टरांनी कोणत्याही रुग्णाला प्रिस्क्रीपनवर बाहेरून इंजेक्शन आणायला लावू नये. तसेच कोणत्याही परिस्थितीत रेमडेसीवीरचा काळाबाजार, गैरवापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. उपलब्ध असलेल्या इंजेक्शनचा वस्तुनिष्ठ पध्दतीनेच वापर करावा, असेही जिल्हाधिका-यांनी बैठकीत सांगितले.
०००००००

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….