कर्तव्यावर असताना कोविडने मृत्यू झाल्यामुळे तलाठ्याचा कुटुंबियांना ५० लाखाचा धनादेश वाटप….

कर्तव्यावर असताना कोविडने मृत्यू झाल्यामुळे तलाठ्याचा कुटुंबियांना ५० लाखाचा धनादेश वाटप….
पुरुषोत्तम कुडवे 9822887065
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :- तहसील कार्यालय मौजा मोठ्या साज्या वर कार्यरत असलेल्या तलाठी कै.वैशाली गजानन काटेकर यांचा कर्तव्यावर असताना कोविड -१९विषाणू संसर्गाने दिनांक 27 सप्टेंबर 2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे शासन निर्णयानुसार कोविड -१९ संबंधित कर्तव्य बजावताना तलाठी याचा कोविंड -१९ विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला. नुसार दिग्रस तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार राजेश वझीरे यांनी लगेचच प्रस्ताव शासनास सादर केला. त्यानुसार सदर प्रस्ताव मार्च 2021 अखेरीस मंजूर होऊन तलाठी यांचे कुटुंबीयांना रुपये पन्नास लाख इतके सानुग्रह अनुदान धनादेशाद्वारे तहसील कार्यालयात मृतकाचे पती गजानन काटेकर व मुलगा यांना तहसीलदार राजेश वझीरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच इतरही मृत्यू नंतरची शासकीय मदत व लाभ याप्रसंगी धनादेशाद्वारे देण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी व नगर परिषद दिग्रस शेषराव टाले हे उपस्थित होते.सदर सानूग्रह सहाय्य काढणे कामी तलाठी आस्थापना ओम गावंडे नायब नाजर प्रशांत मुक्कावार यांनी सहकार्य केले

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!