शेती पूरक जोडधंदा विषयक मार्गदर्शनासाठी ग्रुपची निर्मिती…. शेकडो शेतकऱ्यांच्या समस्यांची झाले निराकरण…
शेती पूरक जोडधंदा विषयक मार्गदर्शनासाठी ग्रुपची निर्मिती….
शेकडो शेतकऱ्यांच्या समस्यांची झाले निराकरण…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- सध्या कोरोना महामारीमुळे कुठेही जाहीर सभा घेतल्या जात नाही. संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्यामुळे शेतकऱ्यांनाही शेतीपूरक विषयाबाबत मार्गदर्शन करणे कठीण झाली आहे. शेतकऱ्यांना शेतीविषयक योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी यवतमाळ जिल्हा किसान मोर्चा भाजपाचे शेतकऱ्यांसाठी ग्रुप तयार करून या ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन दिल्या जात आहे.ग्रुप तयार केल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत असून ग्रुपच्या माध्यमातून अनेक अडचणी सोडविल्या जात आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून शेती विषयी चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे.
यवतमाळ जिल्हा किसान मोर्चा भाजपाचे शेती व शेती पूरक जोडधंदा विषयक मार्गदर्शन
भाजपा आमदार निलय नाईक यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा व किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष माधवराव माने यांच्या नेतृत्वाखाली शेती व शेती पूरक जोडधंदा विषयक मार्गदर्शक श्री गजानन हिंगमीरे भाजपा किसान मोर्चा पुसद शहर अध्यक्ष ह्यांच्या नियोजनात व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. ग्रुपच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना शेती संदर्भातील अडचणी , शासनाच्या नवनवीन योजना , मार्गदर्शन , प्रगतीशील शेतकऱ्यांचे मनोगत व्यक्त केल्या जात आहे. सोबतच प्रगतीशील शेतकऱ्यांचे यशस्वी स्टोरी या ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यां पर्यंत पोहोचविल्या जात आहे.ह्या ग्रुप मध्ये पुसद तालुका कृषी विभागाची सुद्धा चांगली मदत होत आहे. प्रामुख्याने श्री प्रशांत नाईक , तालुका कृषी अधिकारी श्री शुभम बेरड , मंडळ अधिकारी श्री भारत चेके , अभय वडकुते व निलेश राठोड ह्यांचे सुद्धा सहकार्य लाभत आहे.
भाजपा शेतकरी मार्गदर्शन ग्रुप मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सामील होण्याचे आवाहन किसान मोर्चा जिल्हा सचिव रमेश पंडित , किसान मोर्चा तालुका अध्यक्ष ओमप्रकाश शिंदे , किसान मोर्चा शहर अध्यक्ष गजानन हिंगमीरे , किसान मोर्चा शहर उपाध्यक्ष विशाल बोरले , शहर सचिव निल राठोड यांनी केले आहे.