मुस्लिम समाजाची धार्मिक भावना दुखावल्या बद्दल वसीम रिजवी यांच्या वर गुन्हा दाखल करा….. सुन्नी बैतुलमाल , पुसद चे निवेदन एस. डी. ओ मार्फ़त प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांना पाठवण्यात आला…
मुस्लिम समाजाची धार्मिक भावना दुखावल्या बद्दल वसीम रिजवी यांच्या वर गुन्हा दाखल करा…..
सुन्नी बैतुलमाल , पुसद चे निवेदन एस. डी. ओ मार्फ़त प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांना पाठवण्यात आला…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- लखनऊ ( उत्तर प्रदेश ) येथे राहणारे शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिजवी यांनी मा . सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून इस्लाम धर्माचे सर्वात पवित्र धर्मग्रंथ कुराण मध्ये बदल करून त्याच्यात असलेले आयात मधून एकूण २६ आयात वगळण्यात यावी अशी मागणी केली. आम्हाला आशा आहे की सुप्रीम कोर्ट याची ही याचिका डमिट न करता ते फेटाळून लावतील पण वसीम रिजवी यांनी याचिका दाखल केल्या नंतर माध्यमांना बोलताना कुराण व मुसलमानाचे सुरुवात चे तीन खलिफा विरुद्ध अनेक खोटे व बिनबुडाचे आरोप लावले मुख्यतः त्याने सांगितले की कुरान हे आतंकवाद ची शिकवण देतो व इस्लामचे सुरुवातीचे तीन खलिफा यांनी ताकतीचा प्रयोग करून इस्लामचा फैलाव केला पुरांमुळे मुस्लिम युवक आतंकवादकडे वळत आहे वगैरे – वगैरे वसीम रिजवी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ( बाईट ) हे सर्वत्र पसरलेले आहे व त्याचा बोलणे ऐकून मुस्लिम धर्म मानणारे लोकांचे धार्मिक भावना दुखावलेले आहेत व इतर धर्माचे लोकां मध्ये अशी चुकीची माहिती अपप्रचार केल्यामुळे मुस्लिम धर्म व इस्लाम बाबत इतर समाजात तेढ निर्माण करण्याचे काम वसीम रिजवी यांनी केला आहे . वसीम रिजवी विरुद्ध भा .द .वी कलम २९५ व आय .टी .अक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांच्या वर कडक कारवाई करण्यात यावी.अशी मागणी चे निवेदन सुन्नी बैतुलमाल , पुसद च्या वतीने उपविभागीय अधिकारी डॉ व्यकंट राठोड़ यांच्या मार्फ़त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आला आहे
या निवेदना वर मोहम्मद अतीक रिजवी , वसीम निरबान , समीर काज़ी , अनीस जोया , आरीफ कुरैशी , फिरोज खान , हकीमोद्दीन , मोबीन शेख , मोहम्मद जिब्रान सलमान शेख , डॉ राजीक , हकीम चव्हान , साजिद देशमुख , रियाज खान , शेख शेरू , अब्दुल रहेमान चव्हान यांच्या सह्या आहेत….