पूर्ण हिवरा गाव पुढील सात दिवसासाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून होणार घोषित… हिवरा येथील कोरोणा रुग्ण संख्या पोहोचली 46 वर…
पूर्ण हिवरा गाव पुढील सात दिवसासाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून होणार घोषित…
हिवरा येथील कोरोणा रुग्ण संख्या पोहोचली 46 वर…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिवरा (सं) (अनिल बोम्पीलवार) :-
हिवरा येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून ही वाढणारी संख्या थांबवण्यासाठी पुढील सात दिवस संपूर्ण हिवरा गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावे लागतील असे येथील ग्रामपंचायत येथे झालेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी श्री डॉ. स्वप्निल कापडणीस यांनी स्पष्ट केले. यामध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. लोकांनी मास्क सेनीटाजर चा वापर करावा सामाजिक अंतर पाळावे तसेच गर्दी टाळावी कारण यावेळेस रुग्ण वाढीचं प्रमाण हे जास्त आहे त्यामुळे प्रत्येकाने जबाबदार होऊनच वागावं कारण ही वाढलेली संख्या अजून कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सर्व व्यवसायिकांनी व दुकानातील कामगारांनी सुद्धा आपली कोवीड चाचणी करून घ्यावी तरच आपले दुकान आपल्याला उघडता येईल हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत त्यांनी ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्यांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जब्बार पठाण, हिवरा सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य विलासराव भुसारे, हिवरा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मेघा बोरुळकर, उपसरपंच शरद पाटील ,आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एम .एम .शेख व पोलीस पाटील प्रवीण कदम, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य विजयराव बोम्पीलवार, कोतवाल जीवन जाधव आरोग्य अधिकारी प्रणव गावंडे आरोग्य सेविका एस .एम.जांभुळकर व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. _______________________जिल्ह्यासह तालुक्यातही कोरोणा उग्र रूप धारण करत आहे. त्यामुळे जनतेने आता अधिक सावध होणे गरजेचे आहे शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. आरोग्य विभागामार्फत अजून चाचण्या चे प्रमाण वाढवण्यात येतील तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व लोकांनी चाचणी करून घ्यावी व यादरम्यान प्रशासनाला योग्य सहकार्य करावे, तसेच कोरंटाईन असलेल्या लोकांनी नियम मोडल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत फौजदारी स्वरूपाची कारवाई सुद्धा होऊ शकते असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जब्बार पठाण यांनी पॉलीटिक्स स्पेशल प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.