हिवरा येथे कोरोणाचा उद्रेक… पॉलिटिक्स स्पेशल च्या बातमीनंतर प्रशासन सतर्क हिवरा येथील वार्ड क्रमांक 2 प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित..
हिवरा येथे कोरोणाचा उद्रेक…
पॉलिटिक्स स्पेशल च्या बातमीनंतर प्रशासन सतर्क
हिवरा येथील वार्ड क्रमांक 2 प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिवरा :- (अनिल बोम्पीलवार) हिवरा संगम
गेल्या आठ दिवसापासून हिवरा येथे कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी येथील वार्ड क्रमांक दोन हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. आज दिनांक 10 मार्च पर्यंत हिवरा येथील कोरोणाबाधीतांची संख्या तब्बल 16 वर पोहोचली आहे, तर अजून अनेकांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे. येणार्या तपासणी अहवालात अजून हिवरा येथील कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्याअनुषंगाने हिवरा येथील ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समिती यासाठी नागरिकांना वेळोवेळी सूचित करत आहे. हिवरा ग्रामपंचायत मे प्रतिबंधित क्षेत्रात आज, जंतुनाशक फवारणी केली आहे त्याचबरोबर , प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई व तसेच शासनाने निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान चालू ठेवणाऱ्या वर, सामाजिक अंतर न पाळणाऱ्या वर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन दिवसाचा जनता कर्फ्यू सुद्धा जाहीर करण्यात आला आहे या दरम्यान नागरिकांनी शासनाने निर्देशित केलेले नियम काटेकोरपणे पाळावे तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व व्यापाऱ्यांनीतसेच दुकान कामगारांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे. यादरम्यान पॉलिटिक्स स्पेशल, पोर्टलच्या च्या बातमी नंतर, स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून नागरीक सुध्दा नियमांचे काटेकोर पालन करताना दिसत आहे