सर्व प्रकारची दुकाने / आस्थापना हया सकाळी ९ .०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत सुरु राहतील….
सर्व प्रकारची दुकाने / आस्थापना हया सकाळी ९ .०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत सुरु राहतील….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ , १ मार्च :- कोरोना विषाणु मुळे ( COVID – १ ९ ) आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे व या विषाणुमुळे उदभवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे राज्यात साथरोग अधिनियम , 1897 मधील खंड 2,3 व 4 ची अंमलबजावणी अधिसूचनेच्या दिनांका पासून सुरु करण्यात आली आहे आयुक्त , अमरावती विभाग , अमरावती यांनी यवतमाळ जिल्हयातील कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या शहरी व ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभाविपणे अंमलबजावणी करण्या करिता प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित यवतमाळ जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागासाठी सुधारीत निर्देश दिले आहे . ज्याअर्थी या कार्यालयाचे संदर्भाकित आदेश यवतमाळ जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित यवतमाळ जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागासाठी नियम लागू करण्यात आले होते . परंतू यवतमाळ जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लावण्यात आलेल्या नियमांची मुदत वाढविणे आवश्यक आहे .
हे नियम दिनांक ८ मार्च , २०२१ च्या मध्य रात्री पर्यंत लागू करण्यात येत आहे
सर्व प्रकारची दुकाने / आस्थापना हया सकाळी ९ .०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत सुरु राहतील नगर परिषद / नगर पंचायत क्षेत्रातील ज्या उद्योगांना सुरु ठेवण्याकरिता यापुर्वी परवानगी देण्यात आलेली आहे ते सर्व उद्योग सुरु ठेवण्याकरिता परवानगी राहील सर्व प्रकारची शासकीय कार्यालये ( अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आरोग्य व वैद्यकीय , कोषागार , आपत्ती व्यवस्थापन , पोलीस , NIC , अन्न व नागरी पुरवठा , FCI , N.Y.K. बँका सेवा वगळून ) हया १५ % किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राहय धरुन सुरु राहतील सर्व प्रकारच्या खाजगी कार्यालयातील आस्थापना हया एकूण १५ % किंवा कमीतकमी १५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राहय धरुन सुरु राहतील ग्राहकांनी दुकाना मध्ये खरेदी करण्या करिता जवळ पास असलेल्या बाजार पेठ , अतिपरिचित दुकानदार यांचा वापर करावा . शक्यतो दुरचा प्रवास करुन खरेदी करणे टाळावे सर्व प्रकारची उपहारगृहे / हॉटेल्स प्रत्यक्ष सुरु न ठेवता फक्त पार्सल सुविधेस परवानगी राहील लग्न समारंभाकरिता २५ व्यक्तींना ( वधू व वरासह ) तहसिलदार / मुख्याधिकारी यांचे कडून परवानगी अनुज्ञेय राहील सर्व प्रकारची शैक्षणीक कार्यालये ( महाविद्यालय , शाळा ) येथील अशैक्षणीक कर्मचारी , संशोधन कर्मचारी , वैज्ञानिक यांना इ – माहिती , उत्तरपत्रिका तपासणे , निकाल घोषीत करणे ई . कामाकरिता परवानगी अनुज्ञेय राहील मालवाहतुक ही नेहमी प्रमाणे सुरु राहील आणि वाहतूकसाठी कुठल्याही प्रकारचे निबंध राहणार नाही सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करतांना चार चाकी गाडीमध्ये चालका व्यतिरिक्त इतर तिन प्रवासी अनुज्ञेय राहतील . तिन चाकी गाडी ( उदा . ॲटो ) मध्ये चालका व्यतिरिक्त दोन प्रवासी , दुचाकीवर हेलमेट व मास्कसह दोन प्रवासी यांना परवानगी राहील आंतरजिल्हा बसवाहतूक करतांना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० % प्रवासी सह सोशल डिस्टन्सींग व निर्जंतुकीकरण करुन वाहतूकी करिता परवानगी अनुज्ञेय राहील . याकरिता विभागीय नियंत्रक , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ , अमरावती यांनी नियोजन करावे सर्व धामीकस्थळे ही एका वेळी १० व्यक्तीपर्यंत मर्यादीत स्वरुपात नागरीकास सुरु राहतील ठोक भाजीमंडई सकाळी ३.०० ते ६.०० या कालावधीत सुरु राहील . परंतू सदर भाजी मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांना प्रवेश राहील . १४. संपूर्ण यवतमाळ जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची शाळा , महाविद्यालये , शैक्षणीक प्रशिक्षण केन्द्र , खाजगी शिकवणी वर्ग , कोचींग क्लासेस हे बंद राहतील संपूर्ण यवतमाळ जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे , व्यायामशाळा , जलतरण तलाव , मनोरंजन उद्याने , नाटयगृहे , प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे ही बंद राहतील संपूर्ण यवतमाळ जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व सामाजीक , राजकीय , मनोरंजन , शैक्षणीक , सांस्कृतीक , धार्मीक कार्यक्रम व इतर स्नेहसम्मेलन हे या कालावधीत बंद राहतील सकाळी ७.०० वाजेपावेतो मॉर्निंगवॉक व व्यायामास सुट राहील दुग्ध विक्रेते / डेअरी यांची दुकाने ही सकाळी ६.०० ते रात्री ९ .०० वाजेपर्यंत आठवडयाचे सातही दिवस सुरु राहतील . यापुढे सर्व प्रकारचे बाजार , बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शनिवार नियमीतपणे सकाळी ९ .०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुरु राहतील . आठवडा अखेर शनिवारी सायंकाळी ५.०० ते सोमवारी सकाळी ९ .०० पर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी बंद राहतील . सदर संचारबंदीच्या कालावधीत जिल्हयातील सर्व दवाखाने , औषधी दुकाने ( जनावरांचे दवाखाने व त्यांख्च्या औषधी दुकानासह ) , पेट्रोल पंप , गॅस वितरण इत्यादी अत्यावश्यक सेवा सुरु राहतील .