धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप ; पीडितेची मदतीसाठी मोदींना साद
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला आहे. नातेवाईक असलेल्या या तरुणीने ओशिवारी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. एवढेच नाही तर तरुणीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीसाठी साद घातली आहे.
या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. पीडितेने 10 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 11 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांनी अर्ज स्वीकारला आहे.
तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, 2006 पासून तिच्यावर अत्याचार सुरू होते.

पुढे बॉलिवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध धनंजय मुंडे यांनी शारीरिक संबंध ठेवले. तसेच व्हिडिओ काढून आपल्या धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित तरुणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करून मदतीसाठी साद घातली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….