लाचखोर ‘सोनु’ ला वाचविण्यासाठी “संतोष”करतोय जिवाचा आटापिटा कॉल डिटेल तपासल्यास होणार पर्दाफाश
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे मो-९८२२८८७०६५
दिग्रस :-
गत आठवड्यात शासकीय कार्यालयात गौण खनिज उत्खनन प्रकरणात ‘सोनु’ ने केलेल्या लाखो रुपयांचा सेटलमेंटचा व्हिडीओ ठेकेदारा सोबत असलेल्या मित्रा ने काढल्याने प्रभारी अधिकाऱ्यांसह ‘सोनु’ ची झोप उडाली.सेटलमेंटचा व्हिडिओ मिळविण्यासाठी कार्यालयातील “संतोष” करतोय जिवाचा आटापिटा करताना दिसुन येत आहे.तसी चर्चाही दबक्या आवाजात कार्यालयात होत आहे.
लाचखोर ‘सोनु’ पुसद वरून येत असताना आपल्या क्षेत्रातील गौण खनिज उत्खनन होत असल्याचे लक्षात येताच दूरध्वनीवरून माहिती प्रभारी अधिकाऱ्याना दिली. ‘सोनु’ ने जेसीबी व ट्रकच्या चाब्या कार्यालयात आणल्या चालकांला सांगितले की, ठेकेदाराला कार्यालयात पाठवा. गौण खनिज चोरीची कारवाई दडपण्यासाठी ‘सोनु’ ने ठेकेदाराशी केलेला लाखो रुपयांचा सेटलमेंट करते वेळीचा व्हिडिओ ठेकेदारांच्या मित्रा काढला. यामध्ये खुद्द प्रभारी अधिकाऱ्यांच्या ‘आँखो देखी’ व्यवहार झाल्याचे दिसून येते. कार्यरत संतोष खाकीचा आव आणत स्व:ता या प्रकरणाची खाज लावून घेतली. शहरातील व्यवसायिकां मार्फत प्रसारमाध्यावर बातम्या न टाकण्यासाठी दबावतंत्र आणले. तसेच नोटीस देण्याचा दम ही भरला.एवढेच नव्हेतर संतोष व लाचखोर ‘सोनु’ या जोडीने कच्ची चौकातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्यांला प्रकरण मॅनेज करण्यासाठी प्रमोट केले. चर्चेत ठेकेदारांच्या मित्रा कडुन पाच अंकी रकमेची मागणी करताच या खाकीतील जोडीचा असंतोष झाला अन् तडजोड फिसकटली अशी चर्चा दबक्या आवाजात कार्यालयात होत आहे.संतोष हा स्थानिकचा असल्याने हातखंडे वापरण्यात माहिर असल्याचे कार्यालयात बोलले जाते.आमचे काही ही वाकडे होत नाही.तसेच सावरासावर करण्यात पटाईत आहे. या प्रकरणात मला सतरा जनांचे फोन आले.असे म्हणुन संतोष नी आपले कार्यक्षेत्र वाऱ्यावर सोडून लाचखोर ‘सोनु’ ला वाचण्यासाठी मात्र जिवाचा आटापिटा करताना दिसुन येत आहे.या कार्यालयातील त्रिकुटाचा गॉड फादर कोण अशी चर्चा जिल्हा भर होत आहे ऐवढे मात्र नक्की….

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..