राष्ट्रवादीच्या आमदारांचे निधीं बाबत लाड,आम्ही मात्र ताटकळत, शिवसेना आमदारांचा मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा तक्रारीचा पाढा
मुंबई :- प्रतिनिधी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे पुन्हा तक्रारीचा पाढा वाचला .उद्धव ठाकरे सध्या राज्यभरात शिवसेना आमदार राशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी काल पश्चिम महाराष्ट्रतील शिवसेना आमदारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रारी केल्या विशेष म्हणजे त्यांच्या तक्रारीचा रोख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेल्या वित्त विभागाकडे होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या निधीबाबत लाड होतात.आम्हाला मात्र ताटकळत ठेवले जाते. एवढ्या योजनेअंतर्गत कामे देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांना झुकते माप दिले जाते. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये निधीबाबत दुजाभाव केला जातो,अशी तक्रार शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. आपलं सरकार असतानाही काम होत नाही. मतदारसंघासाठी निधी दिला जात नाही, निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामाचे कार्यादेश काढले जात नाही ,असं आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं .शासनाची आर्थिक स्थिती चांगली नाही, त्यामुळे आर्थिक अडचण आहे असे आम्ही मतदारांना सांगतो. पण बाजूच्या मतदारसंघात कामे होत असतील, आणि आमच्याकडे होत नसेल तर काय सांगायचे? अशी ही कैफियत शिवसेनेच्या काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडली.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….