चोरी गेलेल्या वस्तूचा बिटरगाव पोलीस ठाण्यातून परतावा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
शहरातील मुख्य रस्त्यावरील बालाजी हार्डवेअर दुकान दि.२६ ऑगस्ट २० रोजी रात्री ११ वा च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्या दुकानातून दोन मोटार पंप अंदाजे ११ हजार रुपयाचे चोरीला गेले होते रिपोर्ट सचिन सुभाष जन्नावार यांनी दिला त्यावरून कलम ४६१, ३८० प्रमाणे गुन्हा नोंद करून बिटरगाव पोलीस ठाणेदार विजय चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायेभाये, रवी गीते, सतीश चव्हाण, निलेश भालेराव, गजानन खरात व संदीप राठोड यांनी त्या चोरट्यांचा शोध लावून सदर गुन्ह्यातील आरोपी कार्तिक संतोष पोहरकर, अर्जुन गणेश गायकवाड , करण गणेश गायकवाड रा विडूळ यांना तात्काळ अटक करून सदर गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत केला सदर चा मुद्देमाल आज रोजी फिर्यादी सचिन सुभाष जन्नावार यास मुद्देमाल परत करण्यात आला त्यावेळी सचिन जन्नावार यांना न्याय मिळाला व आरोपीला अटक झाली व वस्तू परत दिल्या बद्दल बिटरगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची कौतुक केले
चोरी गेलेल्या वस्तू परत देताना बिटरगाव पोलीस कर्मचारी व फिर्यादी उपस्थित