शहरातील सर्वधर्मिय श्रद्धास्थळांच्या विकासासाठी कटीबद्ध – उपनगराध्यक्ष शैलेश कोपरकर
हनुमान मंदिर व बौध्द विहाराच्या वॉल कंपाउंड साठी २० लाख
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
महागाव शहरात सर्वधर्मिय नागरिक एकोप्याने व गुण्यागोविंदाने नांदतात. या शहरात जातीय सलोख्यामुळे दंगली सारखे अप्रिय प्रकार येथे आजवर घडले नाही. प्रत्येकाला उपासना व धार्मिक स्वातंत्र्य असून महागाव शहरातील सर्व धर्मियांच्या श्रद्धा स्थळांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष शैलेश कोपरकर यांनी केले. हनुमान मंदिर आणि बौद्ध विहाराच्या वॉल कंपाउंडसाठी न.प. च्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रत्येकी १० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचे भूमीपूजन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बौद्ध विहारात उपासनेसाठी येणाऱ्या बौद्ध उपासकांच्या सुविधेसाठी नव्याने स्वच्छतागृह उभारले जाईल, त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती शैलेश कोपरकर यांनी दिली. वॉल कंपांउंडसाठी खा. राजीव सातव,माजी आ. राजेंद्र नजरधने, आ. वजाहत मिर्झा यांनी सातत्याने पाठपुरावा केला असेही त्यांनी सांगीतले. माजी नगराध्यक्ष सुनील नरवाडे,माजी उपनगराध्यक्ष उदय नरवाडे, नगरसेविका हिना सुरैया, छाया वाघमारे,आशा भरवाडे, जयश्री नरवाडे, फिरोजाबी पठाण, मंदा महाजन, नगरसेवक नारायण शिरबिरे,संतोष गंधारे, जयंत चौधरी,आरीफ सुरैया, परवेज सुरैया, मालाताई देशमुख, प्रा. शरदचंद्र डोंगरे,सागर पाईकराव, गजानन साबळे,रमेश सांगडे, महेंद्र कावळे, नंदकुमार कावळे, सतिश गायकवाड, लक्ष्मण कुसंगवाड, साहेबराव ढोले, श्रीराम नरवाडे,व्यंकटेश शिरमवार, गजानन नरवाडे,गोविंद गलांडे, सुधाकर तडसे, शेख सलीम, गजानन नेवारे महेश पोदुटवार, बेबीताई कांबळे, धम्मानंद कावळे आदी मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले.