दारुड्या पित्याचा मुलानेच केला खुन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिनेश मुडे मो-९७६३१२५०७२
बुलढाणा,१७ सप्टेंबर
दारूसाठी पैसे मागून सतत आईला
मारहाण करत असल्याने मुलानेच पित्याची गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना पहूर (ता. लोणार) येथे 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. आज, 18 सप्टेंबर सकाळी पावणेआठच्या सुमारास या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला अटक केली आहे.
रामजी मारोती मारकड (55) असे हत्या झालेल्या पित्याचे नाव असून, विठ्ठल रामजी मारकड असे आरोपी युवकाचे नाव आहे.
रामजी मारकड हे द्वारकाबाई हिला दारू पिऊन मारहाण करून त्रास देत होते. काल सायंकाळीही द्वारकाबाईंना मारहाण करून तिच्या गळ्यातील सोन्याची गहूपोत दारू पिण्यासाठी रामजी घेऊन गेला होता. ही माहिती द्वारकाबाईने विठ्ठलला दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या विठ्ठलने वडिलांचा शोध घेऊन त्यांना गाठले आणि मारहाण करायला सुरुवात केली. रागाच्या भरातच त्याने वडिलांना पाठीत काठीने बेदम मारहाण केली. गळा दाबून त्यांची हत्या केली. या प्रकरणात विठ्ठलची बहीण गंगासागर कुंडलिक जुमडे (30, जांभरूण, जि. हिंगोली) हिने लोणार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी विठ्ठलविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तपास पोलीस निरिक्षक रवींद्र देशमुख करत आहेत.
लोणार तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत हा तिसरा खून आहे. खुरामपूर येथे 3 सप्टेंबर पहाटे सहाच्या सुमारास लक्ष्मीबाई नागरे यांचा नातू नामदेवने पैशांसाठी विळ्याचे वार करून खून केला होता. त्याच दिवशी रात्री दहाच्या सुमारास हिरडव येथे सौ. लक्ष्मीबाई घायाळ यांचा पती विकासने साडीने गळा आवळून खून केला होता. त्यानंतर ही तिसरी घटना घडली असून, या सर्व घटनांतील आरोपी जवळच्या नात्यातील आहेत. पती, मुलगा, नातू असे आरोपी समोर आल्याने एकूणच नातेसंबंध किती तकलादू होत चालले आहेत, याची चर्चा लोणार तालुक्यात सध्या सुरू आहे.

अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडून पुरस्कार परत, पुण्यातील ‘टीडीआर’ प्रकरणी नाराजी ; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय….!
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी…
सोलापूरचा महेंद्र ‘हिंद केसरी’; थारसह पटकावली चांदीची गदा, पुण्याचा पृथ्वीराज उपविजेता…..
महाराष्ट्र सरकारचा मोठा डिजिटल निर्णय; मंत्रिमंडळ बैठकींना आता ‘ऑनलाईन’ हजेरीची मुभा….
महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे पडघम; विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा, मतदारसंघांची संपूर्ण यादी…
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, लातूरमधील नामांकित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात…