जिल्ह्यात गत 24 तासात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 172 नवीन पॉझेटिव्ह, 114 जणांना सुट्टी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 17 :
जिल्ह्यात गत 24 तासात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर 172 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 114 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
मृत झालेल्या सात जणांमध्ये यवतमाळ शहरातील नवजात बालक, 52 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय महिला, तालुक्यातील 65 वर्षीय पुरूष, आर्णी शहरातील 60 वर्षीय पुरुष आणि पुसद शहरातील 65 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. तसेच नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 172 जणांमध्ये 101 पुरुष व 71 महिला आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 1588 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 292 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 6567 झाली आहे. यापैकी 4505 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 182 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 292 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 64998 नमुने पाठविले असून यापैकी 63856 प्राप्त तर 1142 अप्राप्त आहेत. तसेच 57289 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.