महायुद्ध थांबणार..? डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, युद्धबंदीचा ऐतिहासिक करार अंतिम टप्प्यात..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “गेल्या 4 महिन्यांपासून संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेले अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील भीषण युद्ध आता थांबण्याची चिन्हे आहेत. दोन्ही देशांमधील चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, अशी ऐतिहासिक घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
शनिवारी रात्री ट्रम्प यांनी या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीची माहिती दिली. या संभाव्य करारामध्ये जागतिक व्यापारासाठी आणि कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय जहाजांसाठी पुन्हा पूर्णपणे खुली करण्याचाही समावेश आहे.
शांतता कराराची घोषणा लवकरच केली जाईल – डोनाल्ड ट्रम्प
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या ऐतिहासिक कराराची अधिकृत घोषणा करण्यापूर्वी मध्यपूर्वेतील आणि आशियातील प्रमुख देशांच्या प्रमुखांशी फोनवर महत्त्वाची चर्चा केली. यामध्ये कतार, सौदी अरेबिया, यूएई, पाकिस्तान, जॉर्डन, इजिप्त, टर्की आणि बहरीन यांचा समावेश आहे. ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशीही स्वतंत्रपणे चर्चा करून त्यांना या कराराच्या प्रगतीची माहिती दिली. तसेच त्यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ अकाउंटवर माहिती देत लिहिले की, ‘आम्ही अजूनही या कराराच्या अंतिम मुद्द्यांवर बारकाईने चर्चा करत आहोत, लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाईल.’ या पार्श्वभूमीवर इजिप्तनेही सर्व बाजूंना या राजनैतिक संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी खुली होण्याची तीव्र शक्यता
या चर्चेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी सांगितले की, त्यांचा देश अमेरिका आणि इराणमधील संवाद सुलभ करण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच ठेवणार आहे. तसेच आगामी काळात इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराण दरम्यान पुढील उच्चस्तरीय चर्चा आयोजित करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनीही या प्रगतीबद्दल सकारात्मकता दर्शवली आहे. कारण या ऐतिहासिक करारामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मार्गातून कोणत्याही अडथळ्याविना आणि कराविना सुरक्षितपणे ये-जा करता येणार आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेलाही मोठा दिलासा
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प इराणला शांतता करारावर स्वाक्षरी न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी देत होते. शनिवारीच त्यांनी इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा असलेला एक आक्रमक फोटो पोस्ट केला होता. ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘आपण इराणवर पुन्हा एकदा भीषण लष्करी हल्ला करण्याच्या अगदी जवळ होतो. पण आखाती देशांच्या विनंतीवरून हे हल्ले सध्या थांबवण्यात आले आहेत.’ मात्र, या प्रचंड तणावानंतर अखेर दोन्ही बाजू युद्धाऐवजी राजकीय तोडगा काढण्यास तयार झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेने आणि कोसळलेल्या आंतरराष्ट्रीय तेल बाजाराला मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रात दुहेरी संकट..! ३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन….
संसदेतील उत्कृष्ट कामगिरीची दखल ; महाराष्ट्रातील 5 खासदारांना जाहीर झाला प्रतिष्ठेचा संसदरत्न’ पुरस्कार…
महायुती तुटणार..? शिवसेना शिंदे गटाकडून तयारी सुरू..? ; नेमकं काय घडतंय..?
गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
महायुद्ध थांबणार..? डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, युद्धबंदीचा ऐतिहासिक करार अंतिम टप्प्यात..?