महाराष्ट्रात दुहेरी संकट..! ३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “विदर्भात उष्णतेचा प्रचंड कहर सुरू असून वर्धा, अकोला आणि अमरावतीमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले असून, नागरिकांना दुपारी १२ ते ४ घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात सध्या हवामानाचे अत्यंत बदलते चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला काही भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला विदर्भात उन्हाचा प्रचंड तडाखा नागरिकांना सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे. विशेषतः विदर्भातील परिस्थिती चिंताजनक बनली असून, दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडलेले दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने आज वर्धा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे. या भागांत तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेमुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचेही समोर येत आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे वापरणे आणि उन्हात थेट फिरणे टाळणे आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. अमरावती जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून तापमान ४५ ते ४६ अंशांच्या दरम्यान असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या किनारपट्टीच्या भागांत आज दमट आणि अंशतः ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार असले तरी हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवणार आहे. अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे किनारपट्टी भागातील आर्द्रता वाढली असून, नागरिकांना अस्वस्थ करणारे हवामान अनुभवावे लागणार आहे. संध्याकाळच्या वेळी काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असली तरी उकाड्यापासून फारसा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकूणच महाराष्ट्रात सध्या उष्णता, दमट हवामान आणि काही भागांत पावसाच्या सरी असे तिन्ही प्रकारचे हवामान अनुभवायला मिळत आहे. हवामानातील या सतत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय…
काँग्रेसमध्ये चाललंय काय..? ७० नगरसेवक अचानक संपर्काबाहेर, राज्यातील राजकारणात मोठी खळबळ….
अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणावेळी हँड ग्रेनाईडचा स्फोट; 4 जण जखमी..…
संसदेतील उत्कृष्ट कामगिरीची दखल ; महाराष्ट्रातील 5 खासदारांना जाहीर झाला प्रतिष्ठेचा संसदरत्न’ पुरस्कार…
महायुद्ध थांबणार..? डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, युद्धबंदीचा ऐतिहासिक करार अंतिम टप्प्यात..?
महायुती तुटणार..? शिवसेना शिंदे गटाकडून तयारी सुरू..? ; नेमकं काय घडतंय..?
महाराष्ट्रात दुहेरी संकट..! ३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन….