माजी आमदार विजयराव खडसे यांचा महागांव नगरीमध्ये वाढदिवस संपन्न.
उमरखेड विधानसभेला असा आमदार पुन्हा होणे अशक्य.
उपनगराध्यक्ष शैलेश कोपरकर..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागांव, ता. १० :
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उपनगराध्यक्ष शैलेश कोपरकर यांच्या वतिने उमरखेड विधानसभेचे माजी आमदार विजयराव खडसे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. काही माणसं तशी स्वभावाने साधीच असतात पण त्यांच्या साधेपणात एक मोठेपणा असतो, विचारात एक तेज असते, बोलण्यात नम्रता असते, वागण्यात सौजन्य असतं आणि हृदयात स्नेहाचा झरा, अशा माणसांना शुभेच्छा देणे हे देणार्यासाठीच भाग्यच आदर्शवादी, प्रेरणादायी, चारित्र्यसंपन्न नेतृत्व माजी आमदार आदरणीय विजयराव खडसे तुम्ही म्हणजे जनसामान्यांचे एकमेव नाथ गोरगरीब सामान्य जनतेला
तुमची आहे साथ आदरणीय खडसे हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभी राहते ती विनयशील, प्रांजल, निगर्वी असलेली साहेबांची स्वच्छ प्रतिमा. पेशाने शिक्षक असलेल्या सर्वसामान्य यादवराव खडसे यांच्या परिवारात जन्म घेतलेल्या साहेबांनी सर्वमान्य नेतृत्व म्हणून स्वतःला सिद्ध केलं लहानपणापासूनच घरात धार्मिक व सामाजिक वातावरण होते साहेबांची तेव्हापासूनच समाजाशी नाळ जुळली आहे ती आजपर्यंत कायम आहे. 1978 साली साहेब प्रथम उमरखेड पंचायत समितीचे सदस्य म्हणून मुळावा गटातून निवडून आले व समाजाची जुळलेली नाळ आणखी घट्ट झाली. साहेबांनी 12 वर्ष पंचायत समितीचे सदस्य म्हणून भरीव कामगिरी केली. त्यादरम्यान साहेबांना मार्गदर्शन व संस्कार लाभले ते उमरखेड विभागाचे भूषण राजकीय-सामाजिक दैवत लोकनेते नारायणराव पाटील वानखेडे यांचे त्यांच्यावर संस्कार व सामाजिक दायित्वाचा विलक्षण प्रभाव होता तो आजही कायम आहे. लोकनेते नारायणराव पाटील वानखेडे यांच्यासोबतची साहेबांची कारकीर्द आदर्श लोकप्रतिनिधीची कार्यशाळाच होती. तीच सौजन्यशीलता व वागण्याची आदर साहेबामध्ये आहे. पद असो अथवा नसो साहेब कायम लोकांच्या सहवासात, संपर्कात व सुखदुःखात सहभागी राहायचे. त्याचीच फलश्रुती म्हणून 2002 साली साहेबांच्या धर्मपत्नी सौ.प्रतिभाताई विजयराव खडसे या मुळावा जि प गटातून जि. प .सदस्या म्हणून निवडून आल्या. साहेबांच्या एकनिष्ठ पणाची व सामाजिक दायित्वाची मायबाप जनतेने दिलेली ती पावतीच होती. त्यानंतर सौ प्रतिभा ताई यवतमाळ जि. प .च्या अध्यक्षा झाल्या व मुलाव्याला प्रथमच राज्यमंत्री दर्जाचे पद मिळालं. मुळावा हे नाव जिल्ह्याच्या राजकारणात डोलाने उभ राहील. जि.प. अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अनेकांच्या अडचणी व समस्या यशस्वीपणे साहेबांनी सोडवल्या. जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी साहेबा सारख्या प्रशासकासोबत साहेबांनी कौशल्याने व प्रभावीपणे यवतमाळ जिल्हा परिषद चालवली. 2006 साली पैनगंगा नदीला आलेल्या पुरात साहेबांनी संपूर्ण प्रशासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणले व स्वतः घटनास्थळी राहून पूरग्रस्तांना मदत केली. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात साहेबांनी कधी सत्तेचा दुरुपयोग केला नाही, की कधी सत्तेचा अहंकार मनी बाळगला नाही. कायम सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी साहेब झगडत राहिले. म्हणूनच उमरखेड मतदारसंघाने 2009 साली साहेबांना आमदार म्हणून निवडून दिले व विजयराव खडसे हे नाव महाराष्ट्र विधिमंडळाच्या पटलावर अभिमानाने कोरले गेले.
एक अभ्यासू व जनतेची जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे आमदार म्हणून साहेबांनी भरीव काम केले. गाजावाजा न करता, आक्रमक न होता संयमाने जनतेचे प्रश्न सुटू शकतात हे साहेबांनी दाखवून दिले.
साहेबांनी शेतीला जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसायात क्रांती करण्यासाठी अमूल डेरी सारखा यशस्वी दुग्धप्रकल्प या मतदारसंघात कार्यान्वित केला, तसेच आधुनिक शेती करण्यासाठी, प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरासाठी पॉलिहाऊस चा प्रयोग या विभागात यशस्वीपणे राबविला . साहेबांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना स्वार्थासाठी कधी लाचारी पत्करली नाही व अंगभूत असलेली विनयशीलता कधी सोडली नाही म्हणूनच साहेबांच्या सर्वच पक्षात, सर्वच क्षेत्रात ,सर्वच वयोगटात मित्र आहेत ,सर्वांची स्नेहाचे संबंध आहेत. निरागस, सालस प्रांजळ व स्वोजवळ नेतृत्व म्हणजे आदरणीय विजयराव खडसे साहेब. असंही व्यक्तिमत्व राजकारणात असतं, टिकतं आणि शीर्ष स्थान भूषवत. हे विश्वास न बसणारी गोष्ट पण हे सगळं सत्यात उतरणारे आदरणीय विजयराव खडसे साहेब म्हणजे राजकारणातील संतच. साहेबांची वाटचाल बरीच संघर्षमय राहिली आहे त्यात अनेक यश अपशाची वळणे आहेत. साहेबांना दोनदा विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र नाउमेद न व्हता ,आव्हानांना तोंड देत साहेब जनसामान्यांच्या सेवेत राहिले. खचून जातील ते साहेब कसले.
म्हणूनच उपनगराध्यक्ष शैलेश कौपरकर यांना म्हणावेसे वाटते..
थांबलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य ना