रात्रीला जागरण करणाऱ्या ग्रामस्थांनी केला अवैध दारू वाहतुकीचा पर्दाफाश ; गांजेगाव येथील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
मध्यरात्री जागरण करणाऱ्या ग्रामस्थांनी अवैध दारू वाहून नेणाऱ्या वाहनास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना गांजेगाव येथे मध्यरात्री ३ च्या सुमारास उघडकीस आली आहे.त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत सविस्तर असे की ,
ढाणकी परिसरामध्ये एका शेतात दरोडा पडल्याची घटना घडल्यापासून आजूबाजूच्या खेड्यांमध्ये ग्रामस्थ मंडळी रात्री जागरण करत आहे. गांजेगाव येथे गावकरी मंडळी ग्रस्त करत असताना एक वाहन ढाणकी येथून गांजेगाव मार्ग हिमायतनगर जात असताना गावकरी मंडळी चा जमाव बघून अवैद्य दारू वाहतूक करणाऱ्या व्यक्तीने एकूण चार बॉक्स दारू रस्त्यावर फेकून हिमायतनगर दिशेने पसार झाले.
गांजेगाव ग्रामस्थांचे बिटरगाव पोलीस ठाणेदार विजय चव्हाण यांनी कौतुक केले व ग्रामस्थांच्या सांगण्यावरून पोलीस शिपाई निलेश भालेराव , पंडित चव्हाण घटनास्थळी जाऊन चौकशी करून अंदाजी एकूण आठ हजार रुपये किमतीचे चार बॉक्स देशी दारू जप्त केली आहे

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..