उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
आमदार आदित्य ठाकरे यांनी अधिकृतपणे या उमेदवारीची घोषणा केली आहे.
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरावा, अशी आग्रही मागणी केली होती. मात्र, ठाकरे गटाने पुन्हा एकदा अंबादास दानवे यांच्यावरच विश्वास दाखवला आहे.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. महायुतीकडे नऊ जागा असून महाविकास आघाडीला एक जागा येत आहे. यामध्ये ही जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आली आहे. दरम्यान, काल भाजपानेही पाच जागांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. दरम्यान, एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची असून, त्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधान परिषदेची आमदारकी कोणाला देणार या चर्चा सुरू आहेत.
भाजपाने या नेत्यांना दिली उमेदवारी
विधानपरिषदेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी पक्षातील अनेकांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर केला आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली. भाजपने मंगळवारी जारी केलेल्या या यादीत, सुनील विनायक कर्जतकर, माधवी नाईक, संजय नत्थूजी भेंडे, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि प्रमोद शांताराम जठार यांचा समावेश आहे.

राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..
ठाकरेंचा राऊतांना ‘चेक मेट’! आदित्य ठाकरेंनी निर्णय फिरवला आणि संजय राऊतांचा पत्ता कट झाला..?
भाजपनंतर ठाकरे सेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा; विधान परिषद निवडणुकीसाठी १० उमेदवार कोणते..?
विधान परिषदेसाठी फिल्डींग लावलेल्या 74 जणांना धक्का..!
उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा….