भाजपनंतर ठाकरे सेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा; विधान परिषद निवडणुकीसाठी १० उमेदवार कोणते..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा
भाजपनंतर राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावं जाहीर
१० जागांसाठी विधान परिषद निवडणूक होणार आहे
भाजपकडून ६ उमेदवारांची नावं जाहीर
विधान परिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. १० जागांसाठी ही निवडणूक होणार असून सर्व राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावं जाहीर होत आहेत. भाजपने मंगळवारी रात्री ६ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर आज महाविकास आघाडीकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आले आहे. तर शिवसेना शिंदेगटाकडून देखील २ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात येणार आहेत. कोणत्या पक्षाकडून नेमकं कुणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे ते आपण जाणून घेणार आहोत…
विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक होणार आहे. भाजपने ६ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपकडून सर्व नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये सुनील विनायक कर्जतकर, माधवी नाईक, संजय नत्थूजी भेंडे, विवेक बिपिनदादा कोल्हे, प्रमोद शांताराम जठार आणि प्रज्ञा सातव या उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. भाजपकडून प्रज्ञा सातव यांचे नाव आधीच फायनल करण्यात आले होते. तर उर्वरीत ५ उमेदवारांची नाव ठरवताना जातीय आणि प्रादेशिक समतोलाचा विचार करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराची आज घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती पण ते ही निवडणूक लढवणार नाही. त्यांनी पक्षाच्या निष्ठावंताला संधी दिली आहे. शिवसेना ठाकरेसेनेकडून माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांचे नाव जाहीर केले आहे. ठाकरेसेनेकडून अंबादास दानवे यांचे नाव जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. काँग्रेस देखील उमेदवार देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवानेता झिशान सिद्दिकीचे नाव फायनल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. राष्ट्रवादीकडून अमोल मिटकरी यांच्या नावाची देखील चर्चा होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता नेमकं कुणाला संधी देतेय हे काही वेळात स्पष्ट होईल. आता फक्त शिवसेना शिंदेगटाच्या २ उमेदवारांची नावं जाहीर करणं बाकी आहेत. आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..
उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा….
ठाकरेंचा राऊतांना ‘चेक मेट’! आदित्य ठाकरेंनी निर्णय फिरवला आणि संजय राऊतांचा पत्ता कट झाला..?
विधान परिषदेसाठी फिल्डींग लावलेल्या 74 जणांना धक्का..!