“तृणमूलचं सरकार लोकांना राज्यातले मासेही देऊ शकलं नाही ते विकास काय करणार..?”; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सवाल….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “तृणमूल काँग्रेसने फक्त घुसखोरीचं राजकारण केलं. तृणमूलच्या या अमानुष सरकारने तरुणांचा विश्वासघात केला. व्होट बँक खुश व्हावी म्हणून धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचा प्रयत्न ममता सरकारकडून होतो आहे.
कोर्टाने वारंवार याबाबतची याचिका फेटाळली आहे. मात्र लांगुलचालन हा असा रोग आहे जो कोर्टाचा आदेश मानत नाही. तसंच संविधानही मानत नाही असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्दिया येथील सभेत केला.
भाजपाचं सरकार बंगालमध्ये येईल तेव्हा ते संविधानानुसार काम करेल-मोदी
मी आज तुम्हाला हा विश्वास देतो, भाजपाचं सरकार बंगालमध्ये आल्यानंतर ते संविधानानुसारच काम करेल. जो ज्याचा हक्क आहे तो त्याला मिळेल. टीएमसीचं चिटिंगचं राजकारण आणि त्यांचा हा खेळ आम्ही बंद करणार आहोत. सरकारी नोकऱ्यांची भरती वेळेनुसार झाली पाहिजे, प्रत्येक गोष्टींमध्ये, व्यवहारांमध्ये पारदर्शकता असेल. त्यात कमिशनखोरी, दलाली काहीही नसेल हे मी तुम्हाला आश्वस्त करु इच्छितो. भाजपा आणि एनडीएचं सरकार ज्या ठिकाणी आहे त्या राज्यांमध्ये रोजगार मेळावे आयोजित होतात. आता बंगालमध्ये तुम्ही भाजपाचं सरकार आणत आहात. ते आल्यानंतर इथेही रोजगार मेळावे आम्ही आणू.
मासेही तुम्हाला बंगालचं सरकार देऊ शकलेलं नाही-मोदी
पश्चिम बंगालमध्ये मत्स्य पालन हा देखील खूप मोठा व्यवसाय आहे. मात्र परिस्थिती काय आहे ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. बंगालमध्ये माशांची इतकी मागणी आहे पण बंगाल मत्स्य पालनात आत्मनिर्भर नाही. आपल्या राज्यासाठी बंगालला मासेही बाहेरच्या राज्यातून मागावावे लागत आहेत अशी स्थिती आहे. १५ वर्षांच्या कार्याकाळात टीएमसी सरकार तुम्हाला मासे पुरवू शकलेलं नाही. मागच्या ११ वर्षांमध्ये भारताचं मत्स्य उत्पादन दुप्पट झालं आहे. पण बंगालमध्ये टीएमसी सरकारमुळे देशात जे घडलं ते होऊ शकलेलं नाही. हे टीएमसीचं पाप आहे हे विसरु नका. भाजपा आणि एनडीएचं सरकार ज्या राज्यांमध्ये आहे तिथे मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरु झाला आहे. भाजपा सरकारच्या धोरणांमुळे बिहारमध्येही मत्स्य उत्पादन वाढलं आहे. बिहारमधले मासे आता दुसऱ्या राज्यांमध्ये जातात. ही परिस्थिती यापूर्वी नव्हती. आसाममध्येही अशीच स्थिती आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
‘सबका हिसाब होगा’, पंतप्रधान मोदींचा तृणमूल काँग्रेसला इशारा

घुसखोरांच्या लांगुलचालनाचं काम टीएमसीने केलंय-नरेंद्र मोदी
घुसखोरांचं लांगुलचालन हे टीएमसी सरकारने केलं आहे. आयुष्मान भारत योजना आहे त्यात ७० वर्षांवरील रुग्णांना मोफत उपचार मिळतात. या योजनेत पीएम लिहिलं आहे त्यामुळे ही योजनाही बंगालमध्ये टीएमसी सरकार लागू होऊ देत नाही. मला हे मान्य आहे की टीएमसीच्या नेत्यांना माझा तिरस्कार आहे. पण मला हे कळत नाही की हे नेते पीएम शब्दाचा तिरस्कार का करतात? PM शब्द तर जनतेने, संविधानाने दिलेला शब्द आहे. तरीही टीएमसीची कोती मनोवृत्ती दिसते. त्यामुळे बंगालच्या गरीबांचं, वृद्ध बांधवांचं आणि भगिनींचं होतं आहे. पीएम आणि सीएम एकत्र येऊन काम करत असतील तर लोकांचा फायदा होतो. बंगालमध्ये भाजपाचं डबल इंजिन सरकार आलंच पाहिजे. आम्ही बंगालला आत्मनिर्भर बंगाल करुन दाखवू असंही मोदी यांनी म्हटलं आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….