परभणी जिल्ह्यात एकाच दिवशी लाचखोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना ; भूमी अभिलेख कर्मचाऱ्यासह वैद्यकीय अधीक्षक ताब्यात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
परभणी :- “निविदा मंजूर करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारली तर जलसिंचन प्रकल्पात अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीची पुर्नमोजणी करण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याने ८ हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारली.
बुधवारी (दि.८) जिल्ह्यात या लाचखोरीच्या दोन घटना घडल्या.
पालम ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकाने संबंधितांकडून चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी(दि. ८) ताब्यात घेतले. ३२ वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या भावाच्या नांवे असलेल्या ‘परिवर्तन लेबर कॉन्ट्रॅक्टर अँड मल्टीसर्विसेस फँर्म’मार्फत ग्रामीण रुग्णालय पालम येथे स्वच्छता सेवेसाठी टेंडर भरले होते.
हे टेंडर मंजुरीसाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश खंदारे यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली. तक्रारीच्या पडताळणी दरम्यान तडजोडीअंती पंचासमक्ष आरोपी डॉ. रमेश खंदारे याने ४० हजार रुपये स्वीकारताच लाचलुतपत प्रतिबंधक पथकाने त्यास तात्काळ ताब्यात घेतले.
या कारवाईत आरोपीकडून रोख रक्कम तसेच मोबाईल जप्त करण्यात आला असून वाहनात देखील पंधरा हजार रुपये देखील आढळून आले आहेत. याप्रकरणी आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी पालम पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम – १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीस अटकेची तजवीज करण्यात आली आहे.
दुसऱ्या एका गुन्ह्यात जलसिंचन प्रकल्पात अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीची पुर्नमोजणी करण्यासाठी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याने ८ हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतल्याची घटना बुधवारी(दि. ८) घडली.
तक्रारदाराच्या पुतण्याचे पाथरी तालुक्यातील वडी येथील गट क्रमांक २४ मधील शेतजमीन ढालेगाव बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमध्ये गेली आहे. भूमी अभिलेख विभागाकडून पुनर्वसन करिता शेतजमिनीची मोजणी केली. त्यावेळी शेतजमीन कमी मोजण्यात आली. त्यामुळे तक्रारदाराच्या पुतण्याने उपविभागीय अधिकारी पाथरी यांना फेरमोजणीसाठी अर्ज केला.
त्यावर उपविभागीय अधिकारी पाथरी यांनी उपाधीक्षक भूमी अभिलेख पाथरी यांना सर्वे करण्याचे आदेश दिले. दरम्यानच्या काळात तक्रारदाराचा पुतण्या आजारी असल्याने तक्रारदाराने या प्रकरणी पुढील पाठपुरावा केला. यादरम्यान उप उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार रामेश्वर गुरुलिंगप्पा बिडकर यांनी तक्रारदाराला पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली. मंगळवारी तक्रारीच्या पडताळणी दरम्यान तक्रारदाराला पंचासमक्ष उप उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार रामेश्वर बिडकर यांची भेट घेण्यास पाठविले असता भेट न झाल्याने आरोपीने मोबाईल फोनवरून संभाषण करून लाचेची मागणी मागणी केली. त्यानंतर बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पाथरी येथे भेटण्यासाठी बोलविले.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच मागणी कार्यवाही पडताळणीत तक्रारदार आणि पंच यांना रामेश्वर बिडकर यांची भेट घेण्यास पाठविले असता तडजोडअंती आरोपी निमतानदार रामेश्वर बिडकर याने १२ हजार रुपयांच्या लाचेची पंचासमक्ष मागणी केली. तर बुधवारी रचण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान पाथरी येथील साईमंदिर रस्ता परिसरातील एका दुकानात पाथरी येथील उप उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील आरोपी निमतानदार रामेश्वर बिडकर याने तक्रारदाराकडून आठ हजार रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली. यावेळी आरोपीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तात्काळ ताब्यात घेतले.

हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!