संजय गांधी निराधार विभागातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या बदली विरोधात नागरिकांचे निवेदन….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेमध्ये कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष कर्मचारी बाबू प्रणित भवरे यांची अलीकडेच करण्यात आलेली बदली रद्द करून त्यांना पूर्वपदावर कायम ठेवण्याची मागणी करीत आज दिनांक6/4/2026 रोजी निवेदनाद्वारे नागरिक व भीमशक्ती संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदर कर्मचारी यांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणे व पारदर्शक पद्धतीने काम करत गरीब, निराधार व पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ विनाअडचण मिळवून दिला होता. त्यांच्या अनुभवामुळे संजय गांधी निराधार योजनेचे कामकाज सुरळीत सुरू होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
मात्र, अचानक झालेल्या बदलीमुळे लाभार्थ्यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, प्रलंबित प्रकरणांवर परिणाम होण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. नवीन अधिकाऱ्यास कामकाज समजून घेण्यासाठी वेळ लागणार असल्याने योजनांच्या अंमलबजावणीत विलंब होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे जनहिताचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांची बदली तात्काळ स्थगित करण्यात यावी व त्यांना संजय गांधी निराधार विभागातच कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा पुढील कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा इशारा संबंधित संघटनेने दिला आहे, यावेळी भीमशक्ती संघटनेचे शहराध्यक्ष संतोष अंभोरे, तालुका सचिव मोहम्मद अजीम, शेख नादर, यादव हाटे, इंदिरानगर चे माजी सरपंच कांबळे, शेख मुजम्मिल उपस्थित होते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….