दत्त शिखर संस्थान माहुरगडचे ३० वे महंत मधुसुदन भारती यांना देवाज्ञा….!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (नांदेड) :- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र माहुर गड येथील श्री दत्तात्रय संस्थानचे महंत श्री मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती यांना आज शनिवार (दिनांक ४ एप्रिल) रोजी सायंकाळी पाच वाजता देवाज्ञा झाली.
भगवान दत्तात्रयांचे जन्मठिकाण असलेल्या श्रीदत्त शिखरचे ३०वे महंत१००८ श्री.श्री. मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती यांचे शनिवार (दि.४एप्रिल) रोजी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटाला वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असुन त्यांना समाधी देण्याचा कार्यक्रम उद्या रविवार (दि.५एप्रिल) रोजी दुपारी तीन वाजता चे दरम्यान संस्थानच्या नियमाप्रमाणे श्री दत्त मंदिर परिसरात करण्यात येणार आहे.
मधुसूदन भारती महाराज हे दिनांक १४ मार्च १९७८ रोजी रथ सप्तमीच्या शुभ मुहूर्तावर महंत म्हणुन संस्थानच्या गादीवर विराजमान झाले.तब्बल ४०वर्षे त्यांनी महंत म्हणुन याठिकाणी कारभार सांभाळला.संस्थानच्या विकास व भाविकांच्या सोई साठी त्यांनी केलेले कार्य फार मोलाचे आहे.त्यांच्या निधनाबद्दल सर्वच भक्त गणातून शोक व्यक्त केल्या जात आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….