उद्धव ठाकरेंकडून पुन्हा मोर्चेबांधणी,1 आणि 2 एप्रिलला संपर्कप्रमुखांची विशेष बैठक; राज्यभरातील राजकीय परिस्थितीचा अन् पक्ष संघटनेचा आढावा घेणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एक एप्रिल आणि दोन एप्रिल रोजी राज्यभराचा आढावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे . आज पार पडलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे . सोबतच 1 आणी 2 एप्रिलला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जिल्हा संपर्कप्रमुखांची बैठक बोलवली आहे . त्यात 1 एप्रिलला पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक घेण्यात येणार आहे . तर 2 एप्रिलला उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आहे .
उद्धव ठाकरे राज्यभरातील राजकीय परिस्थितीचा आणि पक्ष संघटनेचा आढावा घेणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा संपूर्ण राज्यभरातील राजकीय परिस्थितीचा आणि पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त मुंबईतील नगरसेवकांवर ठाकरेंच्या सेनेकडून नवी जबाबदारी सोपवण्यातआलीआहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पक्षाकडून संपूर्ण राज्यात घेण्यात येणार आहेत. यासाठी मुंबईतील नगरसेवकांवर निरीक्षण म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तरमुंबईसह पहिल्या टर्ममधील खालील नगरसेवकांचा समावेश करण्यातआला आहे.
ठाणे जिल्हा – धर्मेंद्र काळे
नाशिक – सुहास वाडकर
नागपूर – किरण तावडे
वर्धा – सचिन पडवळ
सचिन पाटील – पालघर
निशिकांत शिंदे – चंद्रपूर
तुळशीराम शिंदे – धुळे
जितेंद्र वळवी – नंदुरबार
प्रमोद सावंत – जळगाव
सदा परब, चंगेज मुलतानी – अहिल्यानगर
चिंतामणी निवाटे – जालना
दीपक सावंत – हिंगोली
विश्वास शिंदे – बीड
सुनील मोरे – नांदेड
रमाकांत रहाटे – अमरावती
अनिल कदम – अकोला
हरी शास्त्री – वाशीम
जोसेफ कोळी – बुलढाणा
राज मुल्ला – भंडारा
शशिकांत झोरे – गोंदिया
विजय भनगे – यवतमाळ
विठ्ठल लोकरे – गडचिरोली
अंकित प्रभू – रायगड
गीतेश राऊत – रत्नागिरी
सुरेश पाटील – सिंधुदुर्ग
सोमनाथ सांगळे – पुणे
सत्यवान उभे – सातारा
स्वप्नील कुंजीर – सांगली
कैलास पाठक – सोलापूर
उदय दळवी – कोल्हापूर
आशिष चेंबूरकर – छत्रपती संभाजीनगर
राजू पाटील – परभणी
सुनील पाटील – धाराशिव
मुकेश साळुंके – लातूर

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…