युद्ध थांबवण्यासाठी इराणची सर्वात मोठी अट..! ; होर्मुझबाबत मोठी मागणी; डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडालेली आहे. अशातच आता हे युद्ध संपवण्यासाठी इराणने अमेरिकेसोबत चर्चेसाठी सशर्त सहमती दर्शवली आहे. ही चर्चा पाकिस्तानमार्फत करण्याचा प्रस्ताव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराण चर्चेसाठी तयार आहे, मात्र त्याने काही महत्त्वाच्या अटी मांडल्या आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे त्याच्यावर सुरू असलेले हल्ले तात्काळ थांबवले जावेत आणि अमेरिका तसेच इस्रायल यांनी भविष्यात कोणताही हल्ला करणार नाहीत, याची हमी द्यावी. आता डोनाल्ड ट्रम्प हे नेमका काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इराण चर्चेसाठी तयार, पण…
समोर आलेल्या माहितीनुसार, युद्ध थांबवण्याच्या या मुद्द्यावर 29-30 मार्च रोजी पाकिस्तावातील इस्लामाबाद येथे उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्त सहभागी होणार आहेत. या देशांदरम्यानच्या चर्चेत मध्यस्थीचा रोडमॅप तयार केला जाईल. इराणने यापूर्वी अमेरिकेने सुचवलेला 15 सूत्रीय करार नाकारला होता. आता इराणने 5 अटी अमेरिकेने मान्य केल्यासच पुन्हा चर्चा करण्यास सहमती दर्शविली आहे.
इराणच्या प्रमुख अटी
तात्काळ सर्व हल्ले थांबवले जावेत
भविष्यात हल्ले न करण्याची हमी दिली जावी
पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्त यांनी हमी द्यावी की अमेरिका इराणच्या मुद्द्यांना गांभीर्याने ऐकेल
इराणला होर्मुज सामुद्रधुनीवर पूर्ण नियंत्रण हवे आहे
पाकिस्तानकडून युद्धबंदीसाठी प्रयत्न
पाकिस्तानने इराण आणि अमेरिकेतील युद्ध थांबवण्यासाठी आपले राजनैतिक प्रयत्न अधिक वेगवान केले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांच्याशी फोनवर चर्चा करून तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दिली आहे. तसेच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी अमेरिकेसोबतच्या बैठकीबाबत चर्चा केली. आता इस्लामाबादमध्ये तुर्की, इजिप्त आणि सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत बैठक होणार आहे होत आहे, ज्यामध्ये सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून हे युद्ध थांबवण्याचे मार्ग शोधले जाणार आहेत.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…