काळी (दौलत) ग्रामपंचायत येथे आज ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर’; नागरिकांनी लाभ घ्यावा :– तहसीलदार अभय मस्के….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :- तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान – टप्पा १’ अंतर्गत मंडळनिहाय आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांच्या मालिकेत आज (१४ मार्च) काळी (दौलत) ग्रामपंचायत येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अभय मस्के यांनी केले आहे.
महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांना *‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ द्वारे विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, ७/१२ व ८अ उताऱ्यांतील त्रुटी दूर करणे, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क तसेच डिजिटल उतारे तात्काळ उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
यासोबतच नागरिकांना उत्पन्न, रहिवासी, जात व क्रीमीलेअर प्रमाणपत्रे, सामाजिक अर्थसहाय्य योजना, ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान तसेच तक्रार निवारण सेवा उपलब्ध राहणार आहेत. शासनाच्या नियमानुसार महाभूमी पोर्टलवरून डाउनलोड केलेल्या क्यूआर कोडयुक्त डिजिटल ७/१२ उताऱ्यास कायदेशीर वैधता असल्याबाबतही शिबिरात मार्गदर्शन व प्रात्यक्षिक देण्यात येणार आहे.
काळी (दौलत) व परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अभय मस्के यांनी केले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..