उमरखेडच्या ‘भाऊ’च्या आशीर्वादाने सुरेशचा गुंज मध्ये आतंक..? ; पोलिसांचा वचक संपल्यात जमा,मटका,जुगार,अवैध दारूविक्री,हाणामाऱ्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यात सुद्धा फिरतोय उजळमाथ्याने….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
निलेश नरवाडे ; 8080097267
महागाव :- “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ‘व्यसनमुक्त आणि सशक्त भारत’ करण्याचे स्वप्न दाखवले असताना, यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील गुंज परिसरात मात्र या संकल्पनेचा अक्षरशः लचका तोडला जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या उमरखेड येथील भाऊंच्या वरदहस्ताने सुरेश नामक व्यक्तीने गुंज परिसरात अवैध धंद्यांची पाळेमुळे खोलवर रुजवली असून त्याने याठिकाणी माजविलेल्या दहशतीमुळे आपण किती मोठे भाई बनलो हे युवकांना दाखविण्याचा प्रयत्न करीत असल्याने अल्पवयीन विद्यार्थी,तरुण वर्ग त्याच्याकडे आकर्षित होऊन त्याचे आयुष्य बरबाद होत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.
महागाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गुंज परिसरात गेल्या काही काळापासून सट्टा, जुगार आणि अवैध दारू विक्रीने उच्छाद मांडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे सर्व काळे धंदे चालवणारा ‘सुरेश’ हा उमरखेडच्या ‘भाऊ’च्या भरवशावर उजळ माथ्याने फिरत आहे. पोलिसांचा धाक उरला नसल्याचे चित्र असून, राजकीय दबावापोटी स्थानिक प्रशासनही हतबल झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. कारण अनेक वेळा केलेल्या हाणामाऱ्या,शस्त्र घेवुन गावात दहशत माजविणे यांसारख्या गंभीर गुन्हे तर शिरावर आहेच शिवाय नुकताच ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी कारवाई न करता केवळ सुचना पत्र देऊन सोडल्याने यामागे भाऊंचा अदृश्य हात असल्याचा आरोप नागरिक करीत असुन
भाऊंचा सत्ताधारी पक्ष एकीकडे संस्कारक्षम आणि व्यसनमुक्त समाजाची मांडणी करतो, तर दुसरीकडे त्याच पक्षाशी संबंधित किंवा त्यांच्या आडोशाला असलेले लोक अशा अवैध कृत्यांना खतपाणी घालत आहेत.
जनहिताच्या गप्पा मारणाऱ्या ‘भाऊ’नी आपल्या कार्यकर्त्याला अवैध धंद्यांची मुभा दिलीच कशी?, सत्तेचा वापर समाज घडवण्यासाठी करायचा की तरुणांना व्यसनाच्या खाईत ढकलणाऱ्या अशा ‘सुरेश’ सारख्या लोकांना पाठीशी घालण्यासाठी? असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.
गुंज हा परिसर शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. मात्र, गल्लोगल्ली सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे शालेय विद्यार्थी आणि तरुण मुले या विळख्यात अडकत आहेत. घरची आर्थिक परिस्थिती खालावत असून अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. स्थानिक महिलांनी आणि ग्रामस्थांनी याविरोधात अनेकदा संताप व्यक्त केला आहे, परंतु ‘वरिष्ठांचा हात’ असल्याने कारवाई फक्त नावालाच केली जाते, असा आरोप होत आहे.
आता चेंडू पोलीस प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या दरबारात आहे. गुंजमधील या अवैध धंद्यांची पाळेमुळे उखडून टाकणार की ‘भाऊ’च्या दबावाखाली ही परिस्थिती अशीच कायम राहणार? असा संतप्त सवाल गुंज बिट मधील जनता विचारत असुन सत्ताधारी पक्षाने जर खरोखरच व्यसनमुक्त भारताचा संकल्प केला असेल, तर पक्षाच्या नावाखाली अवैध धंदे करणाऱ्या अशा प्रवृत्तींना तात्काळ लगाम घालणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…