छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत महागाव तालुक्यात विशेष शिबिरांचा धडाका…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
निलेश नरवाडे
महागाव :- सामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नये आणि त्यांच्या तक्रारींना त्वरित वाचा फुटावी, या उद्देशाने महागाव प्रशासनाने कंबर कसली आहे. तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळाच्या ठिकाणी सर्व विभागांना एकत्र आणून ‘विशेष सेवा शिबिरांचे’ आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी दिली.
५ महागाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार अभय मस्के व सर्व मंडळ अधिकारी उपस्थित होते.
राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सुरू असुन या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना विविध कामांसाठी वेगवेगळ्या टेबलवर जाण्याची गरज उरणार नाही. या शिबिरात महसूल विभाग, निवडणुक विभाग,कृषी विभाग, पंचायत विभाग यांसह महत्त्वाचे विभाग एकाच ठिकाणी उपलब्ध असतील
या समाधान सेवा शिबिरामध्ये सातबारा उताऱ्यातील त्रुटी, फेरफार आणि दुरुस्ती.,जातीचे, उत्पन्नाचे व अन्य दाखल्यांबाबतचे प्रलंबित प्रश्न.
संजय गांधी निराधार योजना अंतर्गत नवीन अर्ज व पेन्शन संदर्भातील अडचणी, मतदार यादीतील नावे व ओळखपत्रांविषयीच्या तक्रारी
फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण आणि शासनाच्या विविध अनुदानाच्या योजनांची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, घरकुलाचा निधी न मिळणे, नवीन अर्जांची स्थिती आणि अतिक्रमित जागेवरील घरकुलांचे तांत्रिक प्रश्न यावर जागीच मार्गदर्शन व कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती देऊन नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि अडचणी घेऊन या शिबिरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्थानिक पातळीवरच प्रश्न सुटावेत, हा आमचा मुख्य उद्देश आहे. प्रशासन आपल्या समस्या सोडवण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.असे आवाहन यावेळी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी केले
असे असणार आहे मंडळानुसार शिबिराचे आयोजन.
महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित करण्यात येत असलेल्या शिबिरासाठी प्रशासनाने विविध गावांसाठी तारखा निश्चित केल्या असुन यामध्ये ७मार्च रोजी हिवरा (संगम) येथुन सुरुवात होणार असुन १४ मार्च २०२६ रोजी काळी(दौ),१ एप्रिल २०२६रोजी कासोळा, १० एप्रिल रोजी गुंज,१७ एप्रिल २०२६ रोजी मोरथ,
८ मे २०२६ रोजी फुलसावंगी तर १५ मे २०२६ रोजी महागाव येथे या अभियानाची सांगता होणार आहे.
माध्यमांच्या मदतीने जनजागृती
या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांची मदत घेतली जात आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे महागाव तालुक्यातील हजारो लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…