महाराष्ट्राला 16 नवे आमदार मिळणार : तब्बल 2 महिने रंगणार निवडणुकीचा थरार ; पडघमही वाजले..! ; बारामतीची पोटनिवडणूक ही होणार…?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्राच्या विधिमंडळाला पुढच्या २ महिन्यांमध्ये तब्बल १६ नवे आमदार मिळणार आहेत. त्यामुळे अनेकांनी गुडघ्याला आतापासूनच बाशिंग बांधले आहे. या १६ पैकी १४ विधानपरिषदेत आणि २ सदस्य विधानसभेसाठी निवडले जाणार आहेत.
विशेष म्हणजे यातील काही ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया सुरु देखील झाली आहे.
महाराष्ट्राच्या विधानपरिषेतील विधानसभेतून निवडून गेलेल्या ९ आमदारांचा कार्यकाळ येत्या १३ मे रोजी संपत आहे. त्यासाठी १५ एप्रिलच्या आसपास निवडणूक जाहीर होणार आहे. याशिवाय काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांचीही जागा सध्या रिक्त आहे.
तर विधान परिषदेतीलच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोट्यातली पुणे, सोलापूर, सांगली-सातारा व रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातही निवडणूक होण्याची शक्यता आहे. मतदारसंघात निवडणुकीसाठी तयारीही सुरु झाली आहे. या मतदारसंघातील मतदारांची यादी लवकरच निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध केली जाऊ शकते.
याशिवाय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी आणि अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. कर्डिले यांचे १७ ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. नियमानुसार ६ महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घ्यावी लागते. त्यानुसार १७ एप्रिलपूर्वी इथली निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे.
याचवेळी बारामती मतदारसंघातही पोटनिवडणूक होऊ शकते असा अंदाज आहे. सध्या या दोन्ही मतदारसंघात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनची प्रक्रिया सुरु आहे. राहुरीमध्ये भाजपकडून शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले तर बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील हे जवळपास अंतिम मानले जाते.
शिक्षक अन् पदवीधरचाही कार्यक्रम :
पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि नागपूर, संभाजीनगर, पुणे पदवीधर मतदारसंघातील आमदारांचाही कार्यकाळ ६ डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे या ५ जागांसाठीही यावर्षीच्या दिवाळीदरम्यान निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…