‘काँग्रेसमुक्त भारत का करायला हवा…?’ उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “देशाचा अपमान करायचा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस काम करीत आहे. त्यातूनच दिल्लीतील इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टी-शर्ट काढून घोषणाबाजी केली.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कपडे काढण्याची गरज नाही. त्यांचे कपडे मतदारांनी आधीच फाडलेले आहेत,’ अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे केली. काँग्रेस पक्ष देशाला बदनाम करणारा आहे. काँग्रेसमुक्त भारत का करायला हवा? हे कालच्या कृतीतून दिसून आल्याचेही ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले, ‘लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी प्रत्येक ठिकाणी देशाचा सन्मान कमी करण्याचे काम करीत आहेत. काँग्रेसचे नेतृत्व देशाला हिणवत असून कमी लेखत आहे. जगाच्या पातळीवर देशाला कमी लेखण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे. काँग्रेसचे नेतृत्व अपरिपक्व आहे. राहुल गांधी यांनी परदेशात मुलाखत देताना, भाषणे करताना देशाची बदनामी केली आहे.’
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर फार मोठ्या उंचीवर नेली आहे. असे असताना गांधी हे देशाची बदनामी करीत आहेत. ‘एआय इम्पॅक्ट समिट’कडे जगाचे लक्ष लागले असताना काँग्रेसने आंदोलन करणे हा व्यक्तीचा नव्हे देशाचा अपमान आहे. गांधी हे लोकसभेत भूमिका मांडू शकत होते. पण, टवाळखोर मुलांना कपडे काढून पाठवून देशाचा अपमान केला आहे. या समिटमध्ये जागतिक स्तरावरील अनेक नेते आले होते. याचे भान असायला पाहिजे होते. काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे. याचा प्रत्येक व्यक्तीने निषेध केला पाहिजे.’ असेही सामंत म्हणाले.
‘काँग्रेसच्या नेतृत्वाला देशाबद्दल काही वाटत नाही. पक्षामध्ये काम करणाऱ्या नेत्यांबाबत काही घेणे-देणे नाही. कार्यकर्त्यांबाबत काहीच वाटत नाही. त्यामुळे काँग्रेसची ही अवस्था झाली आहे. विरोधक सूचना करणारे असावेत. स्वतःची इज्जत स्वतः काढायची आणि देशाचीही काढायची असे विरोधक नकोत. काँग्रेसचा हा चेहरा समोर आणण्यासाठी शिवसेनेकडून राज्यभर आंदोलन केले जाणार आहे,’ असे सामंत यांनी सांगितले.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…