भाजपा आमदाराला ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, राजकारणात खळबळ….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
शिरहट्टी :- “भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराला पाच लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. कर्नाटक लोकायुक्त पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
नेमकं घटना काय घडली?
कर्नाटकमधील शिरहट्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार चंद्रू लामाणी यांना कर्नाटक लोकायुक्त अधिकाऱ्यांनी ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. चंद्रू लामाणी यांनी एका कंत्राटदाराकडे तब्बल ११ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
या कारवाईबाबत कर्नाटक लोकायुक्तच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ‘सापळा रचून आमदार चंद्रू लामाणी यांना पकडण्यात आलं आहे. त्यानंतर लामाणी यांची प्राथमिक चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांना औपचारिकरित्या अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांच्यासह त्यांच्या दोन सहाय्यकांनाही ताब्यात घेण्यात आलं असून त्यांचीही चौकशी सुरू आहे.’
लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कर्नाटकच्या गडग जिल्ह्यातील एका लघुसिंचन विभागाच्या प्रकल्पाशी संबंधित एका कंत्राटदाराकडे या आमदाराने तब्बल ११ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराने गडग येथील लोकायुक्त अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली होती.
तक्रार दाखल होताच लोकायुक्त अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली आणि लोकायुक्तच्या पोलिसांनी सापळा रचला. यामध्ये आमदार चंद्रू लामाणी हे ५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ आढळून आले. या कारवाईत लमाणी यांनी मागणी केलेल्या एकूण पैशांपैकी ५ लाख रुपये स्वीकारताना त्यांना पकडण्यात आलं आहे. लोकायुक्तच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या आमदाराच्या व्यतिरिक्त त्यांच्या दोन सहकाऱ्यांनाही घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांचीही आता चौकशी केली जात असून या घटनेत आणखी पुरावे गोळा करण्यात येत आहेत. तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…