शरद पवार सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी सहयोग सोसायटी येथे दाखल…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बारामतीमधील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी भेटीला गेले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे आधी सुनेत्रा पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थाली पोहोचले. त्यानंतर शरद पवार हे देखील सुनेत्रा पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या दिशेला भेटीसाठी निघाल्याची माहिती समोर आली. शरद पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली. या भेटीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार हे पहिल्यांचा त्यांची भेट घेत आहेत. सहयोग सोसायटी येथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे.
बारामतीत सहयोग सोसायटीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं निवासस्थान आहे. अजित पवार यांच्या निधन नंतर पवार कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी राज्यासह देशाभरातील अनेक जण सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी येत आहेत. रोहित पवार यांच्यासह त्यांचे आई-वडील हे देखील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत. संपूर्ण पवार कुटुंबिय इथे आले असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार या देखील सुनेत्रा पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी आले आहेत.
सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी अजित पवार यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. शेकडो कार्यकर्ते इथे दाखल झाले आहेत. शरद पवार सहयोग सोसायटी निवासस्थानी दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्वात आधी अजित पवार यांना अभिवादन केलं. त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला वंदन केलं. यावेळी रोहित पवार हे देखील उपस्थित होते. त्यांनीदेखील अजित पवार यांच्या प्रतिमेच्या समोर वंदन केलं. पवार कुटुंबातील अनेक सदस्य इथे उपस्थित आहेत. अजित दादांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर शरद पवार बाजूला असलेल्या खुर्चीवर आसनास्थ झाले. त्यांच्या बाजूला काही अंतरावर सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र जय पवार उपस्थित आहेत.
अजित पवार यांच्या निधननंतर आज आठवा दिवस आहे. या घटनेमुळे केवळ पवार कुटुंबावर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्र एका दिग्गज नेत्याला मुकला आहे. अजित पवार यांच्या निधन नंतर सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्यासाठी हा काळ खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत या दु:खातून सावरुन पक्ष आणि जनसेवा करण्याची मोठी जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आहे. सुनेत्रा पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची आणि शरद पवारांची भेट झालेली नव्हती. त्यानंतर आज पहिल्यांदाच दोन्ही नेते समोरासमोर येत आहेत. या भेटीदरम्यान शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा होते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, पार्थ पवार आणि जय पवार यांनी याआधी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..