अजित पवारांच्या निधनानंतर CM देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय; पुढच्या 7 दिवसांत…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून, राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत.
मात्र इतक्या घाईघाईत सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाल्याने टीका होत असून, नाराजी व्यक्त केली जात आहे. सुनेत्रा पवारांकडे अर्थ वगळता इतर खाती देण्यात आली आहेत. दिवंगत अजित पवार यांच्याकडे असणारी उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ ही तीन खाती सुनेत्रा पवारांकडे सोपवण्यात आली आहेत.
देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय
महाराष्ट्रात एकीकडे अजित पवारांच्या निधनानंतर हळहळ आणि शोक व्यक्त केला जात असताना, दुसरीकडे जिल्हा परिषदा निवडणुकांकडेही लक्ष आहे. अजित पवारांच्या निधनानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. 7 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
देवेंद्र फडणवीसांकडून प्रचारसभा रद्द
अजित पवार यांच्या निधनामुळे यंदा जिल्हा परिषद निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. देवेंद्र फडणवीस 7 दिवसांत 22 प्रचारसभा घेणार होते.
12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार असून, 5 तारखेपर्यंत प्रचारअवधी आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकही सभा घेणार नाहीत. अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या आहेत.
शरद पवार विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर जाणार
दरम्यान शरद पवार विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर जाणार आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ज्या ठिकाणी अजित पवारांचे अंत्यसंस्कार पार पडले त्याठिकाणी अजित पवार जाणार आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांचा पुतळा बांधणार असल्याने शरद जागेची पाहणी करणार आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..