सुनेत्रा पवार घेणार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत.
उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला आहे. त्या आता उद्या सायंकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
दरम्यान उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते, वर्षा निवासस्थानी बैठक झाली, आणि या बैठकीनंतर अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावर उपमुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आत पक्षाचे कार्याध्यक्ष असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे. उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, या बैठकीमध्ये गट नेत्याची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करायचे? गट नेता कशा पद्धतीने निवडायचा या सर्व गोष्टींवर चर्चा सुरू आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..