अकोल्यात कमळ फुलले..! बहुमताचा आकडा नसतानाही भाजपने राखला गड ; ठाकरेंचा पराभव….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अकोला :- “२९ पैकी पहिल्या महापालिकेचा महापौर ठरला
अकोल्यात भाजपचा महापौर
शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड
राज्यात महापालिका निवडणुका होऊन १० दिवस उलटले आहेत. त्यानंतर आता वेगवेगळ्या महापालिकेसाठी महापौर निवड प्रक्रिया सुरु झाली आहे.
दरम्यान, आता राज्यात पहिल्याच महापालिकेसाठी महापौराची निवड झाली आहे. अकोल्यात भाजपच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड झाली आहे.
शारदा खेडकर प्रभाग क्रमांक 15 च्या नगरसेविका आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा पराभव केला होता भाजपच्या शारदा खेडकर यांचा ४५ मतांनी विजय झाला होता.
अकोल्यात भाजपचा महापौर
भाजपच्या 38 नगरसेवकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1, शिंदेंच्या शिवसेनेचा 1, आणि 2 अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळाला आहे. काँग्रेसच्या आघाडीत गेलेले भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी ऐनवेळी दिला भाजपला पाठिंबा दिला.
दरम्यान, एमआयएमचे 3 नगरसेवक ऐनवेळी तटस्थ राहिले. महापालिकेत काँग्रेसने आधी दावा केला होता परंतु तो फोल ठरला. बहुमत मिळालेलं नसतानाही भाजपने मित्र पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. २९ पैकी पहिल्याच महापालिकेचा महापौर ठरला आहे. अजून इतर महापालिकेच्या महापौराबाबत निर्णय बाकी आहेत. लवकरच इतर महापालिकेचीह महापौर ठरतील, असं सांगितलं जात आहे.
उपमहापौरपदी भाजपाचे अमोल गोगे
अकोला महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपाचे अमोल गोगे विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या आजाद खान यांचा 45 मतांनी विजय केला होता. उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही एमआयएमची तटस्थ भूमिका होती. एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
अकोला महापालिकेत कोणत्या गटाचे किती उमेदवार विजयी?
एकूण जागा : 80
बहुमताचा आकडा : 41
भाजप : 38
काँग्रेस : 21
उबाठा : 06
शिंदे सेना : 01
अजित राष्ट्रवादी : 01
शरद राष्ट्रवादी : 03
वंचित : 05
एमआयएम : 03
अपक्ष : 02

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..