‘एक चुकीचे मत तर शहर विकासापासून दूर’; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘भाजपाकडे विकासाचा.’

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अकोला :- “महापालिकेची निवडणूक शहर विकासाच्या मुद्द्यावर लढली जात आहे. भाजपकडे विकासाचा आराखडा तयार आहे. मतदारांचे एक चुकीचे मत शहराला विकासापासून दूर ठेऊ शकतो, असे मत महसूल मंत्री तथा भाजपाचे प्रदेश निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुने शहर व शिवाजी पार्क येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आ. वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल, बळीराम सिरस्कार यांच्यासह भाजप पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.
हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टाळण्याचे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून विरोधकांवर निशाणा साधला. पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काही जण केवळ मतांचे दान मागून पळणारे असतात. भाजपने सदैव जनहित लक्षात घेतले आहे. अकोला जिल्ह्यातील मालमत्तांची नकाशासह संपूर्ण माहिती त्यांच्या मोबाइलवर देण्याची तयारी सरकारने केली आहे. महायुती सरकारच्या कार्यकाळात लाडकी बहीण योजना बंद होणार नसून लखपती दिदी योजनेच्या माध्यमातून मातृशक्तीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य केले जाणार आहे.
अकोल्याचा विकास कसा घडेल, याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विकास आराखडा तयार आहे. १२६ विकास योजनांची प्रभावी अंमलजबजावणी केली जाणार आहे. रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत योजना सोडवण्यासह उड्डाणपूल, श्री राजराजेश्वर मंदिर विकास, भूमिगत गटार योजना, शहर बससेवा आदी मार्गी लावण्यात येतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.
श्री राजराजेश्वर मंदिरावर असामाजिक तत्त्वांनी हल्ला केला होता. या शहरांमध्ये धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला होता. राज्य सरकारने कायदा व सुव्यवस्था योग्य पद्धतीने हाताळून संरक्षणाचे कार्य केले, असे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले. खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांसह अकोला महापालिकेच्या कार्याची माहिती दिली.
लाडक्या बहिणींविषयी काँग्रेसची द्वेषाची भावना
राज्यातील लाडक्या बहिणींविषयी काँग्रेसमध्ये द्वेषाची भावना ठासून भरली आहे. लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद काँग्रेस व त्यांच्या नेत्यांना बघवत नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊ नका, असे पत्र महाराष्ट्र निवडणूक आयोगाला दिले. काँग्रेसचा हा खरा चेहरा आता पुढे आला आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…