नाईक आणि शिंदे यांच्यात नळावरची भांडणे; आ. रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी मुंबई :- “: वन मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नळावरची भांडणे सुरू आहेत, असा टोला आमदार रोहित पवारांनी लगावला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आणि आमदार रोहित पवार रविवारी नवी मुंबईत आले असताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला.
सत्ताधारी नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील अंतर्गत वादांवर टीका करत सत्ताधारी गटात समन्वयाचा अभाव असून त्याचा थेट फटका शहराच्या विकासाला बसत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रीवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) उमेदवारांच्या प्रचारासाठी नवी मुंबईत भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. रॅलीच्या माध्यमातून विविध परिसरांतून जाताना रोहित पवार यांनी नागरिकांशी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) मतदान करण्याचे आवाहन केले. सत्ताधाऱ्यांनीच महापालिका लुटल्याचा आरोप करत त्यांनी नवी मुंबईतील कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “सत्तेत असलेलेच एकमेकांवर आरोप करत असतील, तर शहराच्या हिताचे निर्णय कोण घेणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
रोहित पवार म्हणाले की, नवी मुंबईतील जनता सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला कंटाळली आहे. नागरी समस्या, रखडलेली कामे आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. “या निवडणुकीत बदल घडवण्याची संधी जनतेकडे आहे. महाविकास आघाडीला मिळणारे मतदान म्हणजे सक्षम आणि जबाबदार कारभारासाठी दिलेले मत ठरेल,” असे त्यांनी सांगितले.
मुंबई आणि परिसरातील निवडणुकांचा संदर्भ देत रोहित पवार यांनी भाजपवरही टीका केली. धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटे आश्वासन देत असल्याचा आरोप केला. “आधीच अदानी समूहासोबत करार झाले असताना एसआरए आणि डीआरपीच्या अखत्यारीत पुनर्विकास केला जाईल, असे सांगून जनतेची दिशाभूल केली जात आहे,” असे ते म्हणाले. धारावीतील रहिवाशांच्या प्रश्नांवर केवळ निवडणुकीपुरते राजकारण सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.
याचबरोबर भाजप आणि शिवसेनेकडून निवडणुकीत दादागिरी केली जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. “पैशाच्या आणि दहशतीच्या जोरावर नगरसेवक खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भातील व्हिडीओ समोर येत असून हे लोकशाहीसाठी घातक आहे,” असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, बाईक रॅलीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वातावरण निर्माण केल्याचे पाहायला मिळाले.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…