देशात मोठ्या घडामोडींचे संकेत? विजय वडेट्टीवारांच्या पोस्टने खळबळ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर सध्या आपण काहीही बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले, तरी पुढील दोन महिन्यांत देशात मोठ्या घडामोडी घडतील, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.
दोन महिने बघा, देशात काय होते. पृथ्वीराजबाबांना याबाबत माहिती आहे, असे म्हणत वडेट्टीवार यांनी अप्रत्यक्षपणे काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचे संकेत दिले आहेत.
त्यांच्या या विधानामुळे अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. देशाच्या राजकारणात सध्या अस्थिरता, सत्तासंघर्ष, तसेच विरोधकांची वाढती आक्रमक भूमिका पाहता वडेट्टीवार यांच्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. देशात काहीतरी घडत आहे याची मलाही थोडी कल्पना आहे, असे सांगून त्यांनी उत्सुकता आणखी वाढवली आहे. मात्र, नेमके काय घडणार याबाबत त्यांनी कोणतेही थेट भाष्य केलेले नाही.
जे होईल ते तुम्हाला कळेल, थोडा संयम ठेवावा लागेल,असे आवाहन करत त्यांनी जनतेला आणि कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत हालचाली, तसेच राष्ट्रीय पातळीवरील राजकीय बदल याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. आगामी काळात त्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय होता, हे स्पष्ट होईल, यात शंका नाही.
दरम्यान, नागपूर इथे सात दिवसाचे अधिवेशन पार पडले पण या अधिवेशनातून ना शेतकऱ्यांना काही मिळाले ना विदर्भातील जनतेला काही मिळाले त्यामुळे हे अधिवेशन वांझोटे ठरले अशी टीका विरोधी पक्षाने केली. अधिवेशन संपल्यावर विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
या पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव म्हणाले निवडणुकीत सरकारी तिजोरीतून पैसे खर्च करण्यासाठी अधिवेशन झाले.सरकारकडून ज्या काही घोषणा झाल्या त्या मुंबई,ठाणे,नवी मुंबई यासाठी झाल्या पण विदर्भासाठी एकही घोषणा करण्यात आली नाही.त्यामुळे विदर्भातील जनतेची फसवणूक करणारे हे अधिवेशन होते अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे अधिवेशन झाले.सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले यांबाबत प्रश्न विचारूनही सरकारने कारवाई केली नाही अशी टीका सचिन अहिर यांनी केली.
विदर्भातील धान,सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी या अधिवेशनाकडे डोळे लावून बसला होता.धानाला आणि सोयाबीनला बोनस मिळावा म्हणून आम्ही मागणी केली पण सरकारने कारवाई केली नाही.राज्यातील तरुणांना. ड्रगचा विळखा आहे पण त्यावर ही कारवाईची ठोस भूमिका सरकारची नाही अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील म्हणाले या अधिवेशनात घोषणांचा नुसता पाऊस पडला. कापूस खरेदीचे केंद्र वाढवा ही मागणी केली पण त्याचा ही निर्णय झाला नाही. पैसे नाही खिशात पण घोषणा मात्र अपार अशी अवस्था महायुती सरकारची आहे. या सरकारने इतक्या घोषणा केल्या की त्यासाठी बजेट कमी पडेल अशी अवस्था आहे, अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….