मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात का संतापले? आमदार सिदार्थ खरातांनी सांगितलं कारण; म्हणाले, “त्यांनी मला.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “हिवाळी अधिवेशनात विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील विविध विकास कामांवर भाष्य केलं.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं. मात्र, यावेळी विरोधी पक्षाच्या काही आमदारांनी सरकारने विदर्भाला काय दिलं? यावरून गदारोळ केला. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विरोधी आमदारांना खाली बसण्याच्या सूचना केल्या. मात्र, आमदारांनी न ऐकल्याने देवेंद्र फडणवीस हे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.
‘तुम्ही पहिल्यांदा निवडून आला आहात, तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही’, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच सुनावलं होतं. दरम्यान, सभागृहात नेमकं काय घडलं होतं? देवेंद्र फडणवीस हे का संतापले होते? याबाबत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार सिदार्थ खरात यांनी वृत्तवाहीनीशी बोलताना सविस्तर भाष्य केलं आहे.
आमदार सिदार्थ खरात काय म्हणाले?
“मुख्यमंत्री फडणवीस हे महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीबाबत मोठमोठे आकडे सांगत होते. तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही हे महाराष्ट्रासाठी करत असलात तरी विदर्भाला त्याचा किती फायदा झाला? बुलढाणा जिल्ह्याला आणि मेहकरला किती फायदा झाला? यावर काहीतरी बोला असं मी म्हटलं होतं. पण त्यावर देवेंद्र फडणवीस मला म्हणाले की तुम्ही थोडसं शांत राहा. मला त्यांनी शांत बसवण्याचा प्रयत्न केला”, असं आमदार सिदार्थ खरात म्हणाले आहेत.
“माझा जो मूळ मुद्दा होता तो तसाच राहिला. मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक आणतात हे ठीक आहे. पण अधिवेशन हे विदर्भात होतं, तर विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केलं? विदर्भात धानचा मोठा प्रश्न आहे, तुरीचा आणि सोयाबीनच्या दराचा प्रश्न आहे. कृषी, सिंचन, रोजगार असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, मुख्यमंत्री फडणवीसांनी फक्त आकडेमोड केली आहे. प्रत्यक्षात या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भाला काहीच मिळालं नाही”, असं आमदार सिदार्थ खरात म्हणाले.
“मुख्यमंत्री फडणवीसांनी फक्त आकड्यांचा खेळ केला. या ठिकाणी महामार्ग होणार आहे, त्या ठिकाणी विमानतळ होणार आहे हेच त्यांनी सांगितलं. पण आमचं म्हणणं असं आहे की आमच्या विदर्भातील शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढणार का? युवकांना रोजगार मिळणार का? अधिवेशन विदर्भात पण घोषणा मुंबईच्या झाल्या आहेत”, असं आमदार सिदार्थ खरात यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनी काय म्हटलं होतं?
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “तुम्ही पहिल्यांदा निवडून आलेला आहात, त्यामुळे तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही. या सभागृहात जेव्हा मुख्यमंत्री किंवा सभागृहाचे नेते बोलतात, तेव्हा एक शिस्त असते. जर मी तुलनात्मक सांगायला लागलो ना, मागच्या काळात विदर्भाला काय मिळालं आणि आता काय मिळालं? तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नाही हे लक्षात ठेवा”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी खडसावलं होतं.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….