“.तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही”, मुख्यमंत्री फडणवीस आमदारावर संतापले; सभागृहात काय घडलं..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “नागपूरमध्ये सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस होता. या अधिवेशनात राज्यातील विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपावरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं.
या पार्श्वभूमीवर आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील विविध विकास कामांवर भाष्य केलं.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टिकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिलं. अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री बोलत असताना विरोधी पक्षाच्या काही आमदारांनी या अधिवेशनात सरकारने विदर्भाला काय दिलं? यावरून गदारोळ केला. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी आमदारांना खाली बसण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्या सूचना आमदारांनी न ऐकल्याने देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कडक शब्दांत त्यांना खडसावलं.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
सभागृहातील एका आमदाराला उद्देशून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “तुम्ही पहिल्यांदा निवडून आलेला आहात, त्यामुळे तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही. या सभागृहात जेव्हा मुख्यमंत्री किंवा सभागृहाचे नेते बोलतात, तेव्हा एक शिस्त असते. जर मी तुलनात्मक सांगायला लागलो ना, मागच्या काळात विदर्भाला काय मिळालं आणि आता काय मिळालं? तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नाही हे लक्षात ठेवा”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी आमदाराला खडसावलं.
शेतकरी कर्जमाफीबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. शेतकरी कर्जमाफीबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्य सरकारने हे कमिंटमेंट केली आहे. हे खरं आहे की आता आपल्यावर जो अतिवृष्टीचा ताण आला, त्यामुळे आपलं बजेट थोडं अडचणीत आहे. या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची यासंबंधीचा निर्णय आपण घोषित केला आहे. त्यासंदर्भात एक समिती आपण तयार केली आहे. की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा शेतकर्यांना फायदा झाला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये.”
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना मागे दोन वेळी कर्जमाफी देऊन देखील शेतकरी पुन्हा कर्जमाफी मागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला ते म्हणाले की, “ही परिस्थिती पण विचारणीय आहे की, आपण २०१७ आणि २०२० ला कर्जमाफी केली तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतो आहे. याचा अर्थ आपल्या नियोजनात कुठेतरी अडचण आहे, आपल्या कर्ज माफीत आणि एकूण शेतकऱ्यांच्या परिस्थितीत आहे. एकदम याच्यावर उपाय योजना येणार नाही. पण टप्प्या टप्प्याने काय उपाय योजना करता येतील आणि त्या उपाय योजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी करणे असे काम ही समिती करत आहे. आपण घोषित केल्याप्रमाणे १ जुलै पर्यंत आपण आपली कर्जमाफीची योजना काय असेल याची घोषणा करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….